प्रवाशांना दिलासा, एअरपोर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

प्रवाशांना दिलासा, एअरपोर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धर्मशाला, सिमला, कांग्रा, कुल्लू मनाली, पितोरागढ आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता

  • Share this:

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९- पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १३ व्या दिवशी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचं योग्य उत्तर देऊ असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. यानंतर उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. तसेच जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले होते. मात्र आता सर्व विमानतळ प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहेत. तसेच व्यावसायिक विमानं पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यापूर्वी सकाळपासून इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धर्मशाला, सिमला, कांग्रा, कुल्लू मनाली, पितोरागढ आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानांना बसला होता. भारत- पाकिस्तानाच्या हवाई पट्ट्यातून जाणारी सर्व विमानं दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र आता विमानतळ सर्व प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहेत.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

काही वेळापूर्वी पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं. पण पाकिस्ताननं काही आगळीक करण्याआधीच भारतीय हवाई दलानं या विमानाला परतवून लावलं आहे. परतताना पाकिस्तानी सैनिकांनी बॉम्बहल्ला केला. मात्र त्याच्याने कोणतेच नुकसान झाले नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या ५ चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 03:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading