मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING: काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू

BREAKING: काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू

ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली.

  • Published by:  Kiran Pharate
श्रीनगर 16 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 39 जवान होते. आतापर्यंत या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोक आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (ITBP vehicle accident) ITBP vehicle accident : अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या जवानांवर काळाचा घाला, बस दरीत कोसळली, घटनास्थळाचे PHOTOS ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान अमरनाथ गुफेकडून म्हणजेच चंदनवाडीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत जवानांची संख्या 10 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. बातमी अपडेट होत आहे 
First published:

Tags: Accident

पुढील बातम्या