तीन महिन्याच्या विमान उड्डाणांसाठी प्रवासभाडे निश्चित, जाणून घ्या काय असणार किंमती

तीन महिन्याच्या विमान उड्डाणांसाठी प्रवासभाडे निश्चित, जाणून घ्या काय असणार किंमती

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी सांगितले की, विमान उड्डाण सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांसाठी प्रवासभाडे निश्चित करण्यात आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी 25 मेपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत विमानसेवेबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विमान उड्डाण सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांसाठी  प्रवासभाडे निश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून विमान कंपन्या त्यांची मनमानी करणार नाहीत. दिल्ली, मुंबईहून 90 ते 120 मिनिटांच्या फ्लाइटचे प्रवासभाडे कमीत कमी 3,500 ते जास्तीत जास्त 10, 000 असेल. पुरी यांनी बुधवारी अशी माहिती दिली होती की, देशामध्ये 25 मे म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती की सोमवारपासून देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू केले जाईल.

वेळेच्या आधारावर 7 कॅटेगरीमध्ये विमान उड्डाण भरतील

1. 40 मिनिटांपेक्षा कमी वेळेचे फ्लाइट

2. 40 ते 60 मिनीट

3. 60 ते 90 मिनीट

4. 90 ते 120 मिनीट

5. 120 ते 150 मिनीट

(हे वाचा-सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर)

6. 150 ते 180 मिनीट.

7. 180 ते 210 मिनीट

यावेळी पुरी यांच्याबरोबर सिव्हिल एव्हिएशन सेक्रेटरी प्रदीप सिंग खरौला देखील उपस्थित होते. ते म्हणाले की 40 टक्के सीट्स निश्चित प्राइस बँडच्या मिडपॉईंटपेक्षा कमी किंमतीने विकल्या जातील. त्यांनी उदाहरण देऊन सांगितले की 3500 ते 10000 रुपये प्राइस बँडचा मिडपॉइंट 6,700 रुपये आहे.  म्हणजेच या प्राइस बँडमध्ये 40 टक्के सीट्स 6 हजार 700 रुपयांपेक्षा कमी दराने बुक करावी लागतील.

वंदे भारत मिशन

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी अशी माहिती दिली की, आतापर्यंत वंदे भारत मिशन अंतर्गत 20 हजारांहून अधिक भारतीयांना देशात परत आणले आहे. 5 मे पासून भारत सरकारने हे मिशन सुरू केले होते.

First published: May 21, 2020, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading