CABमुळे तापलं ईशान्य भारत, क्रिकेट-फुटबॉल सामन्यांना बसला फटका

CABमुळे तापलं ईशान्य भारत, क्रिकेट-फुटबॉल सामन्यांना बसला फटका

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसले.

  • Share this:

आसाम, 12 डिसेंबर : राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद मणिपूर, आसाममध्ये दिसले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. आसाम, मणिपूर या राज्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. सध्या गुवाहटी आणि अगरताळामध्ये होत असलेल्या रणजी सामन्यावर परिणाम झाला आहे. बीसीसीआयनं याआधी जमावबंदीमुळे सामना रद्द करणार येत असल्याचे सांगितले होते. मात्र आता आगरताळा येथे उशीरा सुरू झाला.

बीसीसीआयच्या वतीनं आसाम आणि त्रिपूरामध्ये होणारे सामने रद्द करण्यात आले आहेत. मात्र सध्या अगरताळामध्ये फक्त सामना सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आसाम आणि सर्व्हिसेस टीम यांच्यातील रणजी करंडक सामना खेळला जात असून, आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आसामची राजधानी अगरताळा येथील महाराजा बीर बिक्रम महाविद्यालय स्टेडियमवर त्रिपुरा आणि झारखंड यांच्यातील संघ खेळला जात आहे. यातील अगरताळा मैदानातील सामना सुरू झाला आहे.

वाचा-CAB मंजूर झाल्यानंतर जाळपोळ, ईशान्य भारतात इंटरनेट सेवा बंद, आसाममध्ये कर्फ्यू

तसेच इंडियन सुपर लीग अंतर्गत पूर्वोत्तर युनायटेड आणि चेन्नई यांच्यातील फुटबॉल सामनाही पुढील आदेशापर्यंत तहकूब करण्यात आला आहे. हे सामने पुन्हा कधी सुरू होतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा-CABला विरोध, महाराष्ट्रात IPS अधिकारी अब्दुर रहेमान यांचा राजीनामा

दरम्यान बुधवारी रात्रीपासून काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात वातावरण तापल्यामुळे पूर्वोत्तर भागांतील विमानसेवाही खंडित करण्यात आली आहे. इसजेट, विस्तारा, इंडिगो कंपन्यांनी आसामला जाणारी विमानं शुक्रवारपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला त्रिपूरा, मिझोराम, मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आसाममध्ये अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आसामच्या अतिरिक्त पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलं आहे.

वाचा-मोदी सरकारचा मोठा विजय, राज्यसभेत 'नागरिकत्व' विधेयक मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुस्लीम लीगची याचिका

नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाविरोधात इंडियन मुस्लीम लीगने नागरिकता सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे मोदी सरकारचं लक्ष लागलं आहे.

का पेटलाय ईशान्य भारत?

ईशान्य भारतातला काही प्रदेशांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये केला आहे. हे प्रदेश CAB च्या कक्षेबाहेर आहेत. आसाममध्ये आधीच NRC अंतर्गत नागरिकत्व नोंदणी मोहीम राबवण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रं दाखवून नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्या व्यक्ती बेकायदेशीर नागरिक ठरल्या. त्यांना घुसखोर ठरवण्यात येईल. याउलट आता बांगलादेशातून आणि इतर सीमेजवळच्या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना त्या त्या राज्यात अधिकृत नागरिकत्व घेता येईल. त्यातून या प्रदेशाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 01:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading