लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

80 खासदारांनी या विधेयकांच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. 311 मतांना हे विधेयक मंजूर झालं आहे. तर विधेयकाच्या विरोधात 80 मतं पडली. काँग्रेसचे नेते शशी थरूर, सेनेचे नेते विनायक राऊत आणि एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.  80 खासदारांनी या विधेयकांच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत सोमवारी वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते अमित शहा यांनी उत्तर देत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचं धर्मनिरक्षेप असं आहे की, केरळमध्ये मुस्लिम लीग काँग्रेससोबत आहे तर महाराष्ट्रात शिवसेना आहे, असं म्हणत शहा यांनी काँग्रेसना टोला लगावला. तसंच मुस्लिमांसोबत कोणताही द्वेष नाही, हे विधेयक येणारच, असा दावाही शहांनी केला.

अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली.  नागरिकत्व सुधारणा विधेयकाला चुकीचं असल्याचं विरोधकांकडून पसरवण्यात आलं आहे. बरं झालं देशाचं विभाजन हे धर्माच्या आधारावर नाही झालं. जर असं झालं असतं तर हे विधेयक आणण्याची गरज नसती. जी लोकं देशाच्या फाळणीला सामोरं गेली ते  कोणत्याही जखमेपेक्षा वेगळं नव्हतं. संसदेला हे स्वीकारावं लागेल की, देशाचं विभाजन हे धर्माच्या आधारावर झालं आहे. ज्या भागात जास्त मुस्लीम राहत होते त्यातून पाकिस्तान तयार झाला तर दुसरा भाग हा भारत तयार झाला, असं शहा यांनी म्हटलं आहे.

1951 मध्ये भारतात मुस्लिमांची संख्या 9.8 टक्के होती ती आज 14.23 टक्के झाली आहे. आम्ही कुणासोबत भेदभाव केला नाही. पुढे सुद्धा कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. बांगलादेशमध्ये 1947 मध्ये अल्पसंख्यांकांची संख्या 22 टक्के होती, ती 2011 मध्ये 7.8 टक्के आहे, मग इतकी लोकं गेली कुठे? असा सवालही शहांनी उपस्थितीत केला.

हे विधेयक लाखो शरणार्थ्यांना तणावपूर्ण आयुष्यातून सुखद दिलासा देणारे ठरणार आहे. या विधेयकामुळे त्यांना नागरिकता मिळण्याचं काम होणार आहे. पंतप्रधान मोदींकडून ही त्यांना भेट दिली जाणार आहे, हे विधेयक येणारच हे आता स्वीकारलंच पाहिजे, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

अमित शहांच्या निवेदनातील मुद्दे

देशात एनआरसी कायदा येणारच

शेख मुजीबूर रहमान यांच्या हत्येनंतर सर्वाधिक हिंसा झाली

अमित शहांनी बांग्लादेशचे माजी पंतप्रधान शेख मुजीबूर रहेमान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली

मुस्लिमांसोबत कोणताही राग, द्वेष नाही

बांग्लादेशमध्ये कालांतरानं मुस्लिम हाच राष्ट्रधर्म

पूर्वोत्तर भारताला अमित शहांचं आश्वासन, 371 सोबत छेडछाड करणार नाही

1950 मध्ये नेपाळसोबत करार, नेपाळच्या नागरिकांना भारतात सहज नागरिकता मिळते

काँग्रेस धर्मनिरपेक्षता पक्ष आहे पण केरळमध्ये मुस्लीम लीग त्यांच्यासोबत आहे तर महाराष्ट्रात शिवसेना सोबत आहे

अनुच्छेद 371 मध्ये कोणताही बदल होणार नाही

जी लोकं घुसखोरांना शरण देऊ इच्छित आहे, त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही

दरम्यान, त्याआधी या विधेयकावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शिवसेनेची भूमिका मांडली. तसा हा मुद्दा शिवसेनेसाठी संवेदनशील आहे. मात्र नव्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेने या विधेयकावर वेगळी भूमिका घेत अमित शहांना चांगलंच सुनावलं. हे विधेयक योग्य असलं तरी त्यामागची अमित शहांची भूमिका योग्य नाही. त्यांच्या मनात काहीतरी वेगळच आहे असंही राऊत यांनी सांगत शहांना खडे बोल सुनावले. राऊत म्हणाले, नुसते कायदे करून काहीही फायदा होत नाही. तुम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय केलं. आत्तापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं हे पहिले सांगा आणि नवीन विधेयक आणा. ज्या समुदायांच्या लोकांना तुम्ही नागरिकत्व देऊ इच्छिता असे किती लोक भारतात आहेत याचा आकडाही तुम्ही देऊ शकला नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न, एकाला अटक

नागरिकत्व देणाऱ्या निर्वासितांना मतदानाचा हक्क देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपने जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. पण नंतर ते ट्वीट डिलीट केलंय त्यावरून चर्चा सुरू झाली.

या विधेयकाला शिवसेनेने सशर्त पाठिंबा देत अमित शहा आणि त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केलीय. ज्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येणार आहे त्यांना मतदानाचा अधिकार मात्र देऊ नका अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय. त्यावर आशीष शेलार म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम हिंदुंसाठी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 12:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading