मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदी सरकारचा मोठा विजय, राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर

मोदी सरकारचा मोठा विजय, राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर

**EDS: TV GRAB** New Delhi: Union Home Minister Amit Shah speaks in the Rajya Sabha during the Winter Session of Parliament, in New Delhi, Wednesday, Dec. 11, 2019. (RSTV/PTI Photo)  (PTI12_11_2019_000072B)

**EDS: TV GRAB** New Delhi: Union Home Minister Amit Shah speaks in the Rajya Sabha during the Winter Session of Parliament, in New Delhi, Wednesday, Dec. 11, 2019. (RSTV/PTI Photo) (PTI12_11_2019_000072B)

काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतरही शिवसेनेने फक्त चर्चेत आक्रमकपणा दाखवला, मात्र मतदानाच्या आधी सभात्याग केल्याने सरकारला त्याचा फायदा झाला.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 11 डिसेंबर : वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झालं. या आधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्याने काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्यसभेत आज सहा तासांपेक्षा जास्त तास या विधेयकावर वादळी चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या सर्व आरोप आणि आक्षेपांना सडेतोड उत्तर दिलं. त्यावर अनेकदा वादही झालेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विधेयकाला आक्षेप घेत अमित शहांना टोले लगावले. मात्र शेवटी सभागृहातून सभात्याग केल्याने त्याचा थेट फायदा सरकारला झाला. लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना पाठिंबा देणार नाही असं म्हटलं होतं.

LIVE : 'भारताच्या इतिहासातला काळा दिवस' सोनियांची कडक शब्दांतली प्रतिक्रिया

त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेने सभात्याग केल्याने सरकारला त्याचा फायदा झाला. विधेयकाच्या बाजूने 125  तर विरोधात 105 एवढी मतं पडली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सरकारचा मोठा विजय झाल्याचं मानलं जातंय. विरोधी पक्षांनी विधेयकावर 14 प्रस्ताव दिले होते मात्र हे सर्व प्रस्ताव फेटाळले गेले.

पाकिस्तानातील मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यायचं? अमित शहा राज्यसभेत आक्रमक

आज राज्यसभेत काय झालं?

अमित शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी शेवटी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करून मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला.

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना मोठा दिलासा, आयोगाकडून क्लीन चिट

संजय राऊतांचा शहांना टोला

लोकसभेत शिवसेनेने या बिलाला पाठिंबा दिला होता. नंतर मात्र भूमिका बदलत राज्यसभेत या बिलाला विरोध करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या प्रश्नावर शिवसेनेचे नेते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडत अमित शहांना चांगलेच टोले लगावले. आमच्या देशभक्तीला तुमचं प्रमाणपत्र नको असं सांगत त्यांनी अमित शहांना एक शेरही ऐकवला.

संजय राऊत म्हणाले, या विधेयकाला काही लोक विरोध करताहेत तर काहींनी त्याचं समर्थन केलंय. विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मात्र त्या प्रत्येकाला देशद्रोही म्हणणं योग्य नाही. तुमच्या प्रमाण पत्राची आम्हाला गरज नाही. हिंदुत्वाबद्दलची आमची भूमिका ही जाहीर आहे. ती आजही कायम आहे आणि उद्याही कायम राहील. आम्हाला शिकविण्याची गरज नाही. ही पाकिस्तानची संसद नाही.

First published:

Tags: Citizenship Amendment Bill