'नागरिकत्व' विधेयक : शिवसेना चर्चेला हजर, मतदानाला गैरहजर!

'नागरिकत्व' विधेयक : शिवसेना चर्चेला हजर, मतदानाला गैरहजर!

शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमची भूमिकाही स्वतंत्र आहे. महाराष्ट्र सरकार आणि संसदेतल्या कामाकाजाचा थेट संबंध नाही. आम्ही आमची भूमिका घ्यायला स्वतंत्र आहोत.

  • Share this:

नवी दिल्ली 11 डिसेंबर : वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झालं. याआधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्याने काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्यसभेत आज सहा तासांपेक्षा जास्त तास या विधेयकावर वादळी चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या सर्व आरोप आणि आक्षेपांना सडेतोड उत्तर दिलं. त्यावर अनेकदा वादही झालेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विधेयकाला आक्षेप घेत अमित शहांना टोले लगावले. मात्र शेवटी सभागृहातून सभात्याग केल्याने त्याचा थेट फायदा सरकारला झाला. लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना पाठिंबा देणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेने सभात्याग केल्याने सरकारला त्याचा फायदा झाला.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा, खडसेंना दिलं उत्तर!

मतदानावर बहिष्कार घातल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या या भूमिकेचा महाराष्ट्रातल्या सरकारवर काही परिणाम होणार नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले, शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमची भूमिकाही स्वतंत्र आहे. महाराष्ट्र सरकार आणि संसदेतल्या कामाकाजाचा थेट संबंध नाही. आम्ही आमची भूमिका घ्यायला स्वतंत्र आहोत.

CAB विरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने मोदी सरकारचा मोठा विजय झालाय. मात्र या विधेयका विरोधात महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्याने राजीनामा दिलाय. मुंबईतले अधिकारी अब्दुर रहेमान यांनी हे विधेयक नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आणि घटना विरोधी असल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यांचं आणि धर्मनिरपेक्ष तत्वाच्या हे विरुद्ध असून त्यामुळे सामाजिक एकता मोठा धोका निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी नोकरी सोडत असल्याचं सांगितलंय.

लाच घेतल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेला 5 वर्षांची शिक्षा

रहेमान यांच्या राजीनाम्यामुळे प्रशासनात खळबळ उडालीय. या विधेयकाला देशभर प्रचंड विरोध झाला होता. अशा प्रकारे विरोध करत राजीनामा देणारे रहेमान हे पहिलेच अधिकारी आहेत. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगात ते IG होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shiv sena
First Published: Dec 11, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या