Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

ईशान्येकडे आगडोंब उसळला असतानाच नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर

ईशान्येकडे आगडोंब उसळला असतानाच नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री उशिरा केली नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री उशिरा केली नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री उशिरा केली नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: नागरिकत्व सुधारणा विधेयकावर (Citizenship Bill Protests)राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी रात्री स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. हे विधेयक मंगळवारी राज्यसभेमध्ये मंजूर झालं. विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेनेनं काँग्रेसच्या दबावामुळे सभात्याग केलाची सूत्रांनी माहिती दिली होती.शिवसेनेने सभात्याग केल्याने सरकारला त्याचा फायदा झाला. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 एवढी मतं पडली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सरकारचा मोठा विजय झाल्याचं मानलं जात आहे. विरोधी पक्षांनी विधेयकावर 14 प्रस्ताव दिले होते मात्र हे सर्व प्रस्ताव फेटाळले गेले. गुरुवारी रात्री उशिरा नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं आहे.

दुसरीकडे या विधेयकामुळे ईशान्य भारत पेटला असून तिथे हिंसक आंदोलनं सुरु आहेत. मणिपूर, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा आणि एसएमएस सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. तर आसाम आणि पश्चिम बंगालसाठी जाणाऱ्या विमानांचं उड्डाण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

वाचा-नागरिकत्व सुधारणा विधेयकाने नेमकं काय बदलेल? मनातल्या 12 प्रश्नांची उत्तरं

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर बोलण्यासाठी आसाम विधानसभेचं विशेष सत्र भरवण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

वाचा-फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

नागरिकता सुधारणा विधेयकाला (Citizenship amendment Bill) ईशान्य भारतातून होणारा विरोध (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली.नागरिकता सुधारणा कायदा (Citizenship amendment Bill) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला. आता या कायदा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालेला असतानाच ईशान्य भारतातून होणारा विरोध (Citizenship amendment Bill Protests) तीव्र झाला आहे. आसाममध्ये (Assam) आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय दोघेजण गंभीर जखमी आहेत. आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं की गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कामाविना नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा, मोबाईल सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलनाला अति हिंसक वळण मिळू नये यासाठी जवानांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे ईशान्य भारतात संतापाची लाट उसळत असतानाच नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Amit Shah, Citizenship Amendment Bill, Narendra modi, President ramnath kovind