Home /News /national /

नागरिकांनो सतर्क राहा, कोरोना व्हायरसमुळे 'राज्य आपत्ती' घोषित

नागरिकांनो सतर्क राहा, कोरोना व्हायरसमुळे 'राज्य आपत्ती' घोषित

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे

    तिरुवअनंतपुरम, 4 फेब्रुवारी : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक सावधान राहणे गरजेचे आहे. केरळमध्ये (Kerala) कोरोना व्हायरसचे (Corona Virus) तीन पॉजिटिव्ह प्रकरणं समोर आल्यानंतर आता येथे राज्य आपत्ती (State Disaster) घोषित करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री पिनरई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांनी राज्य आपत्ती घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. काल सोमवारी केरळमध्ये कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण समोर आला. आणि केरळमध्ये कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. चीनमधील वुहान येथून काही दिवसांपूर्वी दोन लोकांबरोबर या व्यक्ती केरळमध्ये आल्या होत्या केरळमध्ये चीन आणि कोरोना व्हायरस प्रभावित देशांचा दौरा करणारे 1,999 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी अधिकतर जणांना विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 75 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे अडलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी 324 जणांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान सकाळी 7.30 वाजता दिल्लीत पोहोचलं. यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विमानतळावर या सगळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. तर ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दिल्लीत या रुग्णांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलाय. त्यात या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. या लोकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचं खास डबल डेकर जंबो 747 हे विमान पाठविण्यात आलं होतं. विमानात तज्ज्ञ डॉक्टरांची एक पथकही सज्ज होतं. त्याचबरोबर विमानतळावरही डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या