मराठी बातम्या /बातम्या /देश /ISC 12 Exams: सीबीएसई पाठोपाठ CISCE बोर्डाच्याही 12वीच्या परीक्षा रद्द

ISC 12 Exams: सीबीएसई पाठोपाठ CISCE बोर्डाच्याही 12वीच्या परीक्षा रद्द

ISC 12 Exams Cancelled: सीबीएसई बोर्डाच्या पाठोपाठ आता आसएससीई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ISC 12 Exams Cancelled: सीबीएसई बोर्डाच्या पाठोपाठ आता आसएससीई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ISC 12 Exams Cancelled: सीबीएसई बोर्डाच्या पाठोपाठ आता आसएससीई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 1 जून: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीआयएससीई बोर्डाच्या (CISCE) बारावीच्या परीक्षा रद्द (ISC 12th Exam cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्य घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या संदर्भात कशा प्रकारे मूल्यांकन करण्यात येणार याचे निकष लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे.

ICSE बोर्डाने सांगितलं की, आससीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा (ISCE Class 12th exam cancelled) रद्द कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Exam