आज सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह

सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 25, 2017 08:59 AM IST

आज सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह

25 डिसेंबर: आज ख्रिसमस म्हणजे जगाला शांतीचा संदेश  देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस.आज जगभर ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे.

मुंबई जवळच्या वसईतही ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. गाव सजली आहेत ख्रिसमस इव्हला तर वसई रोषणाईने उजळून निघाली होती. आज अनेक ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. येशूचा जन्मोत्सव साजरा केला जातो. देशभर आज या सणाचा उत्साह आहे. सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे.

आज जगभर युद्ध आहेत,अस्थैर्य आहे. अस्वस्थता आहे. यासगळ्या अशांततेमध्ये येशू ख्रिस्ताचा क्षमाशिलतेचा आणि  शांततेचा संदेश हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरतो.धर्म जात पलीकडे जाऊन भारतात सर्वत्र या सणाचा उत्साह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close