चौकीदार ही चोर है; 'हे' व्हिडीओ व्हायरल

चौकीदार ही चोर है; 'हे' व्हिडीओ व्हायरल

चौकीदार ही चोर है, या आरोपावरून आता दोन्ही पक्ष सोशल मीडियावर देखील परस्परांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चौकीदार ही चोर है' अशा शब्दात  लक्ष्य केलं. त्याला उत्तर म्हणून भाजपनं देखील 'मैं भी चौकीदार हूं' असा व्हिडीओ करत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर जोरदार युद्ध रंगलं असून व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आता एकमेकांना उत्तर देताना दिसत आहेत. असेच काही व्हिडीओ, जाहिरात आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता या आरोप - प्रत्यारोपांना आणखी जोर चढणार आहे.

भाजपच्या नेत्यांनी ट्विटरवर बदललं नाव

दरम्यान, राहुल गांधींनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या ट्विटर हॅडलवर चौकीदार असं नाव मागे लावत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात लोकसभा निवडणुकांच्या प्रचारांनी जोर पकडला आहे. दोन्ही पक्षातील नेते परस्परांवर जोरदार आरोप करताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं असून व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

VIDEO : 'पप्पू की पप्पी', प्रियांका गांधींबद्दल बोलताना भाजप मंत्र्याची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading