Home /News /national /

शेतीत उत्पन्न कमी; हा पर्यायी मार्ग निवडून कमवू शकता वर्षाला 8 ते 10 लाख रुपये

शेतीत उत्पन्न कमी; हा पर्यायी मार्ग निवडून कमवू शकता वर्षाला 8 ते 10 लाख रुपये

पाऊस न पडल्याने कधी पिक येत नाही तर कधी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिके धुवून जातात. यामुळे उत्पन्न तर सोडाच, पण पेरणी आणि लागवडीसाठी केलेला शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी कमाईच्या इतर साधनांकडे वळणं गरजेचं झालं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 23 जून: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाऊस न पडल्याने कधी पिक येत नाही तर कधी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिके धुवून जातात. यामुळे उत्पन्न तर सोडाच, पण पेरणी आणि लागवडीसाठी केलेला शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी कमाईच्या इतर साधनांकडे वळणं गरजेचं झालं आहे. गांडूळ खतनिर्मिती (Vermi compost) हा एक सर्वांत चांगला पर्याय ठरू शकतो. यातून वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न कमवता येऊ शकतं. ‘जागरण हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. मागील काही वर्षांत गांडूळ खताच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च न करता याचा प्रकल्प उभारून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. आपल्या घरातील पशुधनाच्या शेणापासून गांडूळ खतनिर्मिती करून पैसे कमावता येऊ शकतात. हेही वाचा - VIDEO - अवघ्या 10 सेकंदावर होता मृत्यू; तरी ट्रॅकवर प्रवाशाला वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी आणि... उपलब्ध साधन संपत्तीत गांडूळ खतनिर्मिती शक्य गांडूळ खतनिर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्लॉट किंवा मोठी जमीन घेण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी ठरवल्यास घराच्या जवळपासच्या मोकळ्या जागेवर गांडूळ खतनिर्मितीचं काम केलं जाऊ शकतं. कुठलंही जनावर खताजवळ जाऊन त्याचं नुकसान करू नये म्हणून गांडूळ खतनिर्मिती केली जात आहे त्या जागी जाळी लावून ती जागा बंदिस्त करायला हवी. गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प उभारताना खर्चही अत्यल्प आहे. पॉलिथिन किंवा सिमेंटचा एक हौद बनवण्याची गरज आहे. याशिवाय गांडूळ विकत घेण्यासाठी थोडाफार खर्च करावा लागेल. या व्यतिरिक्त जास्त खर्च करण्याची गरज आहे. कशी करावी गांडूळ खतनिर्मिती गांडूळ खतनिर्मितीसाठी शेतकऱ्यांना जमिनीचं सपाटीकरण करणं आवश्यक असतं. त्यानंतर पॉलिथिन विकत आणून 1.5 ते 2 मीटर रुंदीचा सिमेंटचा हौद बांधावा. त्यात पॉलिथिन पसरवून त्यावर 1 ते 1.5 फूट उंचीचा शेणाचा थर पसरवून टाकावा. त्यानंतर यात गांडूळ टाकावे. जवळपास एका महिन्याच्या आत गांडूळ खताची निर्मिती होऊ शकते. याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart) करता येईल. जर 20 हौदात गांडूळ खतनिर्मिती केल्यास 2 वर्षांत जवळपास 8 लाख ते 10 लाखांपर्यंत कमाई होऊ शकते. दरम्यान, भारतातील पीक पद्धतीत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात निश्चित फायदा होईलच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाहीत. उलट शेतकरी कर्जबाजारी होत असून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अशा स्थितीत गांडूळ खतनिर्मितीसह इतर पर्यायाकडं शेतकऱ्यांनी वळायला हवं. विशेष म्हणजे गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन केलं जातं.
First published:

Tags: Farmer

पुढील बातम्या