'चौकीदार चोर है' : भाजपने राहुल गांधींविरोधात दाखल केली याचिका

'चौकीदार चोर है' : भाजपने राहुल गांधींविरोधात दाखल केली याचिका

सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे. चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे. चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे.

राहुल गांधींचं हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाकडे भाजपने ही याचिका दाखल केली. राहुल गांधी हे नरेंद्र मोदींवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. याबदद्ल आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाची नाराजी व्यक्त केली आहे, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्यांनी ही याचिका दाखल केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करत आहे, ही तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगापुढे मांडली. मतदान केंद्रांवर काही मतदारांना पळवून लावण्यात आलं,असं सांगत निर्मला सीतारमण यांनी तृणमूल काँग्रेसने केलेल्या गैरप्रकारांचा पाढाच वाचला.

राहुल गांधींनी मोदींवर मारलेले ताशेरे हे फक्त बिनबुडाचे आरोपच नाहीत तर हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. याआधीही राफेल प्रकरणावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यावर वडिलांचं बोफोर्सचं पाप धुण्यासाठीच राहुल गांधी राफेलचा मुद्दा पुढे करत आहेत,असं नरेंद्र मोदींनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

===============================================================================================================================================================

VIDEO : सुजय विखेंच्या प्रचार सभेत रामदास आठवलेंच्या 'लय भारी' कविता

https://lokmat.news18.com/maharastra/lok-sabha-election-2019-ramdas-athavle-at-ahmednagar-new-video-dr-361666.html

First published: April 12, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading