Home /News /national /

'चिंतन' शिबिरानं सोनिया गांधींची 'चिंता' वाढवली? पक्षाध्यक्षपदासंबंधी समोर आली ही मागणी

'चिंतन' शिबिरानं सोनिया गांधींची 'चिंता' वाढवली? पक्षाध्यक्षपदासंबंधी समोर आली ही मागणी

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय उदयपूरमध्ये नवसंकल्प शिबिरासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यात प्रियंका गांधींचं पोस्टर नव्हतं.

    नवी दिल्ली, 15 मे : संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीतीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी काँग्रेसने नवसंकल्प शिबिराचं (Congress Chintan Shivir news) आयोजन केलं होतं. मात्र, शिबिरात नेतृत्वाचा मुद्दा (Congress Party President) गाजला. यादरम्यान अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही अध्यक्ष करण्याची मागणी (Demand for Priyanka Gandhi Vadra to be Congress President) केली. राजकीय घडामोडी समितीत झालेल्या चर्चेदरम्यान पक्षाचे नेते आणि धार्मिक नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अध्यक्ष बनवण्याची जोरदार मागणी केली. प्रमोद कृष्णम यांनी ही मागणी केली, तेव्हा या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या. हे वाचा - काँग्रेसमध्ये आता एका कुटुंबाला एकच तिकीट, महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबांचे काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णम म्हणाले की, दोन वर्षांपासून राहुल गांधींचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ते अध्यक्ष व्हायला तयार नसतील तर, प्रियंका गांधी यांना अध्यक्ष करा. समितीचे निमंत्रक मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपलं म्हणणं मांडून मौन बाळगणं पसंत केलं. इतर अनेक नेत्यांनीही पक्षात प्रियंका गांधी यांची भूमिका वाढवण्याची मागणी केली. हे वाचा - देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, काँग्रेस एका कुटुंबाला एकच तिकीट देणार प्रियांका यांना राष्ट्रीय स्तरावर आणलं पाहिजे, असं दीपेंद्र हुड्डा म्हणाले. त्यांनी यूपीपुरतं मर्यादित राहू नये. बिहार काँग्रेसचे नेते रणजीत रंजन यांनीही प्रियंका गांधी यांनी केवळ एका राज्यापुरतं मर्यादित राहू नये, यावर सहमती दर्शवली. मात्र, नवसंकल्प शिबिरासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीच उदयपूरमध्ये काँग्रेसच्या केवळ माजी अध्यक्षांची पोस्टर्स लावली आहेत. मात्र, प्रियंका गांधींचं पोस्टर कुठेच नाही.
    Published by:Digital Desk
    First published:

    पुढील बातम्या