Home /News /national /

हेलिकॉप्टरने केले हेलिकॉप्टरला एअर लिफ्ट, हवाई दलाचा धडकी भरवणारा VIDEO

हेलिकॉप्टरने केले हेलिकॉप्टरला एअर लिफ्ट, हवाई दलाचा धडकी भरवणारा VIDEO

018 मध्ये MI 17 हेलिकॉप्टर जिथे कोसळले होते. गेल्या 15 दिवसांपासून या हेलिकॉप्टरचे अवशेष कसे उचलून नेता येईल, याबद्दल अंदाज बांधला जात होता.

    रुद्रप्रयाग, 17 ऑक्टोबर: उत्तराखंड (Uttarakhand) येथील रुद्रप्रयाग (RudraPrayag) मध्ये 2018 मध्ये अपघातग्रस्त झालेले भारतीय हवाई दलाचे (India Airforce) MI 17 हेलिकॉप्टर (MI 17 Helicopter) चे अवशेष अखेर चिनूक चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने उचलण्यात आले आहे. हे अवशेष जवळील हवाई तळावर घेऊन जाण्यात येणार आहे. मागील 15 दिवसांपासून याची तयारी सुरू होती. हवाई दलाचे अधिकारी केदारनाथमध्ये दाखल झाले होते. 2018 मध्ये MI 17 हेलिकॉप्टर जिथे कोसळले होते त्या अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. गेल्या 15 दिवसांपासून या हेलिकॉप्टरचे अवशेष कसे उचलून नेता येईल, याबद्दल अंदाज बांधला जात होता. अखेर या कामासाठी चिनूक हेलिकॉप्टरची निवड करण्यात आली. चिनूक हेलिकॉप्टरने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष अलगद उचले आणि नजीकच्या हवाई तळावर नेण्यात आले आहे. 2018 मध्ये केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या हेलिपॅडवर लँड करत असताना हवाई दलाचे  एमआय -17 हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलट किरकोळ जखमी झाला होता. पण, या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे हवाई दलाने अपघातग्रस्त MI-17 हेलिकॉप्टर तिथेच सोडून दिले होते. सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप भोवले, मुंबई पोलिसांनी केली वकिलाला अटक त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिराच्या मागे हेलिपॅडवर उतरत असताना हेलिकॉप्टर हे लोखंडी गर्डरला धडकले होते. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये आग लागली होती. या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झाले होते. एमआय-17 हे मालवाहू हेलिकॉप्टर होते.  गुप्तकाशीहून ते केदारनाथला जात होते. पण, केदारनाथमध्ये पोहोचल्यावर हेलिपॅड उतरण्याआधीच अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये केदारनाथमधील यंत्र सामुग्री होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Uttarakhand

    पुढील बातम्या