'मसाज' करण्यासाठी मुलींना खोलीत बोलावलं, चिन्मयानंदने दिली गुन्ह्याची कबुली

'मसाज' करण्यासाठी मुलींना खोलीत बोलावलं, चिन्मयानंदने दिली गुन्ह्याची कबुली

'मसाज' करण्यासाठी मुलींना बोलावणं ही माझी मोठी चूक होती. माझ्या या कृत्याचा मला पश्चाताप होतोय आणि लाजही वाटते असंही त्याने सांगितलं'

  • Share this:

शाहजहांपुर 20 सप्टेंबर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते स्वामी चिन्मयानंदने(Swami Chinmayanand)  लैंगिक शोषणाची कबुली दिलीय. अनेक दिवसांच्या तपासानंतर स्वत:ला साधू म्हणवून घेणाऱ्या या ढोंगी स्वामीला SITने आज अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. SITने त्याची कसून तपासणी केली. त्यावेळी चिन्मयानंदने सर्व गुन्हे कबुल केले अशी माहिती पुढे आलीय. चिन्मयानंदला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोढडीत पाठविण्यात आलंय. SITने पत्रकार परिषद (Press Conference)  घेऊन तपासाची माहिती  दिली. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडालीय. लॉ कॉलेजच्या (Law Studemnt Rape Case) मुलींच्या लैंगिक शोषणाचा त्याच्यावर आरोप आहे.

वाचा - आशा जवळ जवळ संपुष्टात; मिट्ट काळोख आणि -183 तापमानात 'विक्रम' एकटा!

चिन्मयानंदने गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं की, लॉ कॉलेजच्या मुलींना मसाज करण्यासाठी मी खोलीत बोलावलं होतं. ही माझी मोठी चूक होती. माझ्या या कृत्याचा मला पश्चाताप होतोय आणि लाजही वाटते असंही त्याने म्हटल्याचं SITने सांगितलं.अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चिन्मयानंदला अतिशय महत्त्वाचं समजलं जाणारं गृहराज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. ते विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीतही सक्रिय होते.

काय आहे प्रकरण?

चिन्मयानंद प्रमुख असलेल्या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या लॉ कॉलेजच्या मुलींनी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून हा स्वामी लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. असे 16 व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्वामीच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. तर आपल्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी हा बनाव करण्यात आल्याचं चिन्मयानंद यांनी सांगितलं होतं.

वाचा - NASA कडून मिळाले विक्रम लँडरसंदर्भात महत्त्वाचे फोटो, पुन्हा एकदा आशा पल्लवित

SIT करतेय चौकशी

SITने त्या प्रकरणाचीही चौकशी केली असून त्या प्रकरणी पीडित मुलींच्या दोन चुलत भावांना आणि त्याच्या मित्रालाही अटक केलीय. या प्रकरणाची वाच्यता होऊनही उत्तर प्रदेश पोलीस गांभीर्याने कारवाई करत नव्हते. त्यामुळे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. या प्रकरणी कोर्टाने SITची स्थापना करून आपल्या देशरेखीखाली चौकशी सुरू केल्यानंतर तपास वेगाने होऊ लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या