चिनी नवरा आणि पाकिस्तानी नवरी, चीनमधले तरुण पाकिस्तानमध्ये येऊन का करतात लग्न?

चिनी नवरा आणि पाकिस्तानी नवरी, चीनमधले तरुण पाकिस्तानमध्ये येऊन का करतात लग्न?

चीन आणि पाकिस्तान हे मित्र देश असल्याचा बोलबाला नेहमीच होत असतो. पण आता तर या दोन देशांमध्ये रोटीबेटी व्यवहारही होऊ लागले आहेत. चिनी तरुण लग्न करण्यासाठी पाकिस्तानला येऊ लागले आहेत,

  • Share this:

इस्लामाबाद, 8 मे : चीन आणि पाकिस्तान हे मित्र देश असल्याचा बोलबाला नेहमीच होत असतो. पण आता तर या दोन देशांमध्ये रोटीबेटी व्यवहारही होऊ लागले आहेत.

चीनमध्ये एकच मूल होऊ देण्याची परवानगी असल्यामुळे तिथे स्त्री - पुरुष गुणोत्तर बदलत चाललं आहे. त्यामुळे लग्नासाठी चीनच्या तरुणांनी पाकिस्तानकडे धाव घेतली आहे. चीनमधले तरुण पाकिस्तानच्या मुलींशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानमध्ये येत आहेत.

फ्लॅट नसेल तर लग्न नाही

चीनमध्ये लग्नाला योग्य मुलींचं प्रमाण कमी होतं आहे. त्यामुळे खास करून मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या तरुणाकडे स्वत:चा फ्लॅट किंवा नोकरी नसेल त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावायला पालक राजी नसतात.

चीनच्या मोठ्या शहरांमध्ये घरं खूप महाग झाली आहेत. त्यामुळे ती घेणं परवडतही नाही. अशा स्थितीत ही चिनी मुलं चिनी मुलींशी लग्न करू शकत नाहीत. यामुळेच या चिनी तरुणांनी परदेशात जाऊन गरीब मुलींशी लग्न करण्याचा मार्ग अवलंबला आहे. यातली बरीच लग्न तुटलीही आहेत पण तरीही अशी लग्न लावून देण्याचा एक उद्योगच पाकमध्ये सुरू आहे.

गरीब ख्रिश्चन मुलींशी लग्न

पाकिस्तानमधल्या गरीब ख्रिश्चन मुलींशी हे तरुण लग्न करतात. त्यासाठी पाकिस्तानमध्ये तर एजंट्स आहेत. हे चिनी तरुण पाकिस्तानमध्ये चट मंगनी पट ब्याह करतात. हे एजंट्स या मुलांची ओळख गरीब कुटुंबाशी करून देतात. त्यासाठी त्यांना 50 ते 60 हजार रुपयांचा मोबदला मिळतो.

पाकिस्तानमध्ये सध्या असे चिनी तरुण आले आहेत. स्वस्तात लग्न करण्याचा मार्ग ते चोखाळत आहेत. पाकिस्तानमध्ये आल्यानंतर त्यांना अशा पाद्रीचा शोध सुरू असतो जो बेकायदेशीर चर्चमध्ये लग्न लावून देईल. त्या बदल्यात त्या पाद्रीला 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जातात. हे सगळं करून एका लग्नासाठी त्यांनी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो.

चीनमध्ये लग्न का आहे महाग?

हेच लग्न जर चीनमध्ये करायचं झालं तर खूप महागात पडतं. तिथे लग्नाचा खर्च मुलाकडच्यांना करावा लागतो. शिवाय मुलीकडच्या लोकांना मोठमोठे आहेर द्यावे लागतात.

पाकिस्तानात लग्नाचं रॅकेट

पाकिस्तानमध्ये लग्न केल्यानंतर चिनी तरुण आपल्या पत्नीला चीनमध्ये घेऊन जातो. पण बऱ्याच वेळा अशी लग्नं फार टिकत नाहीत. पहिल्या सहा महिन्यात किंवा वर्षभरातच तक्रारी सुरू होतात.

याचा फायदा लग्नाचे एजंट्स उठवतात. एक लग्न तुटल्यावर पुन्हा दुसऱ्या लग्नाचं आमिष दाखवलं जातं. व्हिसा मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रंही जोडली जातात. या रॅकेटचा पर्दाफास करण्यासाठी पाकिस्तानच्या फेडरल इनव्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने 7 चिनी लोकांना अटकही केली आहे.

चिनी नवरा आणि पाकिस्तानी नवरी

काही ठिकाणी चिनी पुरुष हे पाकिस्तान - चीन कॉरिडॉर प्रकल्पासाठी पाकिस्तानमध्ये आले आणि पाकिस्तानी मुलींशी लग्न करून तिथेच राहिले. पाकिस्तानमधल्या ग्वादर बंदराजवळ तर एक पूर्ण चिनी शहर वसवलं गेलं आहे.

व्हिएतनाम, लाओस आणि उत्तर कोरियाच्या मुलींशी लग्न

चिनी तरुण लग्नासाठी फक्त पाकिस्तानातच येतात असं नाही तर व्हिएतनाम, लाओस, उत्तर कोरियाच्या मुलींशीही ते लग्न करतात.

पाकिस्तानमध्ये चीनने कॉरिडॉरचा प्रकल्प सुरू केल्यापासून 2013ते 2017 या काळात 91 हजार चिनी तरुणांना पाकिस्तानचा व्हिसा दिला गेला. 2017 मध्ये 12 हजारांपेक्षा जास्त चिनी तरुण पाकिस्तानला व्हिसावर आले. मागच्या दोन वर्षांत 750 ते 1000 पाकिस्तानी मुलींची चिनी मुलांशी लग्न केली आहेत.

======================================================================================

VIDEO : 'ही' मराठी अभिनेत्री दिवसा शूटिंग करते आणि रात्री रिक्षा चालवते!

First published: May 7, 2019, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading