News18 Lokmat

बेंगळुरूमध्ये चिनी नागरिकावर हल्ला

शनिवारी रात्री उशिरा इंद्रनगर भागात रस्त्यात उभा असताना 5 जणं बाईकवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 11:14 AM IST

बेंगळुरूमध्ये चिनी नागरिकावर हल्ला

बेंगळुरू, 31 जुलै: कर्नाटकातील बेंगळुरू येथील इंद्रनगर भागात एका चिनी नागरिकावर 5 जणांनी हल्ला केला. दरम्यान जखमी चिनी नागरिकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

'यान' असे या चिनी नागरीकाचे नाव आहे. यान एका बिझनेस ट्रीपसाठी बेंगळुरूमध्ये आला होता. तो शनिवारी रात्री उशिरा इंद्रनगर भागात रस्त्यात उभा असताना 5 जणं बाईकवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला चोरीच्या उद्देशनाने केला होता.

आरोपींनी त्याला लुटण्याचाही प्रयत्न केला आणि त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करून ते आरोपी पळून गेले. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी पाचही जणांना अटक केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...