मुंबई, 2 डिसेंबर : भारत आणि चीन यांच्यात अनेक वाद आणि ताणतणाव होते आणि आजही आहेत. वारंवर या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी केले होते. पण या ताणतणावात इतिहासाची पाने थोडी मागे उलटताना एक चीनी नाव देखील सापडले जे भारत आणि चीन यांच्यात मैत्री व्हावी म्हणून खूप प्रयत्न करत होते. ज्यांनी या दोन्ही देशांत मध्ये संस्कृतीची मशाल पेटवली होती, ज्यांनी भारताला आपले दुसरे घर बनवले होते, ज्यांनी या दोन्ही देशांमध्ये प्रेम आणि आदर मिळवला होता.
चीनच्या हुनान प्रांतात 1898 मध्ये जन्मलेल्या टॅन-युन-शानचे नाव लोकांनी फारच क्वचित ऐकले असेल. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रिय असलेल्या टॅननेही या तीन महापुरुषांचे सोबत अनेक मार्गांनी काम केले होते. टॅन हे केवळ बापूंच्या नव्हे तर त्यांच्या आदर्श विचारांची इतके जवळचे होते की त्यांना चिनी महात्मा देखील म्हटले जात असे. टॅनच्या आयुष्यातील काही न ऐकलेले किस्से आता आपण जाणून घेऊयात.
गांधींशी अशी झाली भेट
सन 1928 मध्ये कोलकत्ता येथे महात्मा गांधींची महासभा होणार होती तेव्हा सुमारे एक लाख लोक त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जमले होते त्यापैकी एक टॅन हे होते.ते गांधींना पाहण्यासाठी खूप उत्सुक होते खरंतर त्यावेळी पण कोलकत्यातील टागोरांचे शांतिनिकेतन मध्ये काम करत होते म्हणून ते गांधीजींच्या सभेला उपस्थित होते तेव्हा कोणाला ठाऊक होते गांधींनी ज्याला अहिंसा (Non Violence) ज्याला म्हटले आहे त्यालाच पुढे जाऊन टॅन हे त्याला नॉन हर्टिंग असे संबोधतील. त्यानंतर तीन वर्षांनी बार्डोली सत्याग्रह झाला. चीन मधले अनेक विद्वानही गांधीजींना भेटायला येत असत 1931 मध्ये टॅन बारडोली ला गेले आणि त्यांची पहिल्यांदा गांधीजींची भेट झाली. या पहिल्या भेटीत गांधीजींनी त्यांना शाकाहारी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि दलाई लामा यांचे पत्र घेऊन बापूंना भेटायला आलेल्या टॅन यांना गांधीजींच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. त्याच वेळी गांधीजींनी त्यांचे नाव शांती असे ठेवले. आणि नंतर त्यांना चीनचा महात्मा असेही म्हटले गेले.
टागोर आणि टॅन यांची जवळीक
चिनी आणि पाश्चात्त्य ज्ञानाचा अभ्यास घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेऊन टॅन यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. दरम्यान सुमारे 30 वर्षांच्या टॅन यांनी 1927 मध्ये प्रथमच सिंगापूरमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या प्रतिभेमुळे प्रभावित होऊन टागोरांनी त्यांना शांतिनिकेतन येथे येऊन शिकण्याची ऑफर दिली. जी त्यांना मान्य होती. स्वतः टॅननासुद्धा कल्पना नव्हती की ते टागोरांच्या कधी इतके जवळ जाऊ शकतील.
त्यानंतर पुढील वर्षी टॅन हे भारतात टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती येथील चिनी स्टडी सेंटर फॉर चायनीज स्टडीज येथे प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी दुसरा कुठल्याही गोष्टीत वेळ न घालवता संस्कृत आणि भारतीय ज्ञान शिकण्यास सुरुवात केली. त्या वेळी भारतीय संस्कृती धर्म तत्त्वज्ञान आणि रूढी यावर अनेक कविता आणि लेख त्यांनी लिहिले. इंडॉलॉजी स्वीकारल्यानंतर त्यांनी भारतातील सीनोलॉजी भारतामध्ये एकत्र करण्यास सुरुवात केली. लवकर शांतिनिकेतन येथे चिना भवनाची स्थापना झाली. जिथे भारत आणि चीन हे शिक्षण आणि सांस्कृतिक अभ्यास एकत्र केला आणि एक मोठे ग्रंथालय तयार केले.
भारत आणि चीनमधला मैत्रीचा सेतू
टॅन यांनी केवळ शिक्षण आणि संस्कृतीच्या माध्यमातूनच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही दोन्ही देशांमधील मैत्रीचा फुलवण्याचा प्रयत्न केला पत्रकार सीता चक्रवर्ती यांच्या लेखनानुसार 1938 मध्ये नेहरूंच्या चीन भेटीत आणि नंतर चीनचे पंतप्रधान झाऊ इनलाइ यांच्या 1957 मध्ये भारत भेटीत महत्त्वाची भूमिका बजावणारे टॅन हे होते. त्यानंतर 1954 आणि 1959 मध्ये चिनी प्रमुख माओच्या आमंत्रण नुसार हे स्वतः चीनला सुद्धा गेले होते. अशाप्रकारे भारतात स्थायिक झालेले टॅन भारत आणि चीनमधील मेसेंजर बनले होते. परंतु 1959 भेटीनंतर सीमेवर मतभेद झाल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू लागले आणि चीनने आपली जमीन ताब्यात घेत असल्याचे सांगितले.
चीनमधील युद्ध आणि भारतात टॅन
स्वातंत्र्यापूर्व काळात 'हिंदी चीनी भाई भाई' अशी घोषणा तयार झाली होती. त्यामुळे जवळपास तीन हजार चिनी लोक स्वतंत्र भारतात आपले घर बनवून रहात होते. तथापि भारत-चीन नंतर 1959 ते 1972 च्या युद्धाच्या काळात हे सर्व संबंध बिघडले. आणि नंतर ते सतत खालावत गेले. यावेळी राजस्थानमधील देवळी येथे एक नजरबंदी शिबिराची स्थापना करण्यात आली होती. जिथे अनेक चिनी लोक भारतात स्थायिक झाले होते काहींना खूप वेळ छावणीत सुद्धा ठेवले गेले होते.
या अशा काही जखमा आहेत ज्या भरल्या जाऊ शकत नाहीत दोन देशांना जवळ आणण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणार्या टॅनलाही संशयास्पद नजरेतून बघण्यात आले. परंतु नेहरूंमुळे अनेक कुटुंबांना देवळीला पाठवणे शक्य नव्हते असे त्यांचा मुलगा टॅन चुंग यांनी सांगितले.
नेहरूंच्या भाषणाचा सूर बदलला तेव्हा
भारत-चीन युद्धाच्या एक महिन्यानंतर नेहरू शांतिनिकेतनमधील दीक्षांत समारंभास पोहोचले तेथे भाषण देताना ते चीनबद्दल आक्रमक बोलताना त्यांना श्रोत्यांत टॅन दिसले मग त्यांनी स्वर खाली आणत स्पष्टपणे सांगितले की भारताचं युद्ध चीनी लोकांशी नसून चीनच्या सरकारशी आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनेने टॅन यांच्या मनाला अधिक धक्का बसला होता. इंडिया चायना शेअर्ड कल्चर हा शब्द रचलेल्या टॅन यांनी या घडामोडीनंतर आपले संपूर्ण आयुष्य बोधगया मध्ये घालवले. तेथे त्यांनी बौद्ध धर्माचे शिक्षण आणि अध्यात्मात काम केले. जागतिक बौद्ध अकॅडमीची स्थापना देखील त्यांनी केली. जिथे काही वर्षातच त्यांनी चिनी मंदिर बांधले व तिथेही ते राहत होते. 1983 टॅन यांनी भारतातच शेवटचा श्वास घेतला. त्यांनी 1933 मध्ये चीनमधील नांजिंगमध्ये चीन-भारत फ्रेंडशीप सोसायटी सुरू केली होती. नंतर टागोरांच्या मदतीने कोलकात्यात भारत-चीन फ्रेंडशीप असोसिएशन सुरू केली. सध्या लडाखमध्ये चीन-भारतादरम्यान तणाव असताना काही लोकांनी दोन्ही देशांतील मैत्री संबंधांसाठी प्रयत्न केली होती हे सर्वांना माहीत असावं म्हणून हा लेखनप्रपंच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.