चीनचा मुजोरपणा सुरूच, लद्दाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानांच्या घिरट्या

चीनचा मुजोरपणा सुरूच, लद्दाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानांच्या घिरट्या

गेल्या काही दिवसांपासून चीनने या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतीय सैन्य आणि चीनी सैनिक यांच्या हाणामारीही झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 1 जून: लद्दाखजवळ असलेल्या सीमेजवळ चीनच्या हद्दीत आज लढाऊ विमान दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनच्या हद्दीत असलेल्या त्यांच्या चळावर दहा ते बारा लढाऊ विमाने तैनात असून ते उड्डाण घेत असल्याचंही स्पष्ट झालं झालं. भारती लष्कर आणि हवाई दल चीनच्या सर्व हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. चीनची प्रत्येक हालचाल टिपण्यात येत असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनने या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारतीय सैन्य आणि चीनी सैनिक यांच्या हाणामारीही झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढला होता. यात काही सैनिक जखमीही झाले होते. देशात कोरोनाचं संकट असतानाही चीन सीमेवर अचानक आक्रमक झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.

नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तणाव कमी करण्यासाठी मध्यस्तीची तयारी दर्शवली. मात्र भारताने अशी मध्यस्तता फेटाळून लावली आहे. भारत आणि चीन थेट बोलण्यासा समर्थ असून मध्यस्तीची गरज नाही असं भारताने म्हटलं होतं.

तर सोमवारी न्यूज18 दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतावर कुणीही दबाव आणू शकत नाही असं सांगितलं. या प्रश्नावर मुत्सद्देगिरीच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचा -

कोरोना विरुद्ध नरेंद्र मोदी सरकारने यशस्वी लढा दिला - अमित शहा

ठाकरे सरकारवर अमित शहांचं मोठं वक्तव्य, हे आहेत मुलाखतीतले 10 महत्त्वाचे मुद्दे

 

 

First published: June 1, 2020, 11:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading