लडाख भागात चीनची घुसखोरी, साध्या वेषात आले होते सैनिक

या भागातले नागरीक हे दलाई लामांचा वाढदिवस साजरा करत असतानाच ही घुसखोरी झाली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 07:37 PM IST

लडाख भागात चीनची घुसखोरी, साध्या वेषात आले होते सैनिक

नवी दिल्ली 12 जुलै : डोकलाम नंतर चीनने लडाख सीमेवरही घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनचे सैनिक हे साध्या वेशाषात आणि गाड्यांमध्ये सीमेजवळच्या एका खेड्याजवळ आले होते. दमचॉक भागात ही घुसखोरी झाली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. या भागातले नागरीक हे दलाई लामांचा वाढदिवस साजरा करत असतानाच ही घुसखोरी झाली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. पूर्वोत्तर राज्यांमधली चीनला लागून असलेल्या सीमेवर वारंवार असे प्रकार घडत असतात. डोकलाम नंतर भारतीय लष्कराने या भागातली आपली गस्त वाढवली आहे.

दलाई लामांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना चीनचा विरोध असतो. शेजारच्या मित्र देशांनाही चीन दलाई लामांचा वाढदिवस साजरा करू देत नाही. लेह आणि लडाख भागात दलाई लामांचा प्रभाव आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या भागात असल्याने त्यांचा वाढदिवस तिथे साजरा होतो. त्याची माहिती घेण्यासाठीच चीनचे सैनिक आले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Loading...

ऋषिकेशचा लक्ष्मणझुला पर्यटकांसाठी का झाला बंद?

चीन करणार भारताला मदत?

भारत आणि चीनचे संबंध तणावाचे नसले तरी फार चांगले आहेत, असे देखील नाही. साधारण वर्षभरापूर्वी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तेव्हा निर्माण झालेला तणाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार चीनने पंतप्रधान मोदींना मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

कर्नाटकातल्या 'राजीनामा नाट्या'वर दिग्विजय सिंहांचा गौप्यस्फोट

'ग्लोबल टाईम्स'मधील रिपोर्टनुसार चीनला भारतात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करण्याची आहे. चीनच्या मते मोदींनी देशातील परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवावे. देशात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मोदींना असंतोषाचा समाना करावा लागत आहे आणि ही गोष्टी चीनसाठी निश्चितपणे चांगली नाही.

SBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत

भारतात केंद्र सरकार कमकूवत आहे. पण लोकसंख्येमध्ये विविधता आहे. मोदी त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी चांगली होतील, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...