भारत आणि पाकमधला तणाव निवळावा - चीनची प्रतिक्रिया

भारत आणि पाकमधला तणाव निवळावा - चीनची प्रतिक्रिया

भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट् मंत्री वँग यी यांना बुधवारी मध्यरात्री अर्जंट फोन कॉल केला.

  • Share this:

दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट् मंत्री वँग यी यांना बुधवारी मध्यरात्री अर्जंट फोन कॉल केला. यांग वी यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी विस्ताराने बातचीत केली होती. त्यानंतर लगेचच कुरेशी यांनी त्यांच्याशी बातचीत केली. भारत, रशिया आणि चीनच्या परारष्ट्र मंत्र्यांची याधीच बैठक झाली होती.

 भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव निवळावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या संघर्षाची तीव्रता वाढू नये, यासाठी दोन्ही देश सामोपचाराने मार्ग काढतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही चीनचे पराराष्ट्र मंत्री वँग वी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करून भारताला असणाऱ्या दहशतवादी धोक्याची जाणीव करून दिली. 'जैश ए मोहम्मद' चा म्होरक्या मसूद अझर याचा यूएन च्या दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याची भारताची मागणी चीनने वेळोवेळी हाणून पाडली आहे. संयुक्त राष्ट्रांनी याआधीच 'जैश' चा समावेश दहशतवादी संघटनांमध्ये केला आहे.

 भारत आणि पाकिस्तानमधला तणाव निवळावा यासाठी चीन विधायक दृष्टिकोनातून प्रयत्न करेल, असं वँग वी यांनी म्हटलं आहे. कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व आणि हद्दीचं संरक्षण याचा आदर केला पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

VIDEO : फोनवर आई म्हणाली, He Is No More माझा मुलगा देशाच्या कामी आला

First published: February 28, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading