डोकलाम प्रकरणी चीनची नवी खेळी

डोकलाम प्रकरणी चीनची नवी खेळी

डोकलाममध्ये ज्या ठिकाणी संघर्ष झाला होता, तिथे हे सैनिक नाही आहेत. तिथून काही मीटर अंतरावर हे सैनिक आहेत. पण भारताला ही चिथावणी आहे, यात वाद नाही. याआधी चिनी सैनिक गस्तीसाठी रोज डोकलामला यायचे आणि निघून जायचे. 1600-1800 चिनी सैनिकांचा मुक्काम आहे.

  • Share this:

 11 डिसेंबर:  भारत, भुतान आणि चीनच्या सीमेवरच्या डोकलाममध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.  डोकलाममध्ये 1600 ते 1800 चिनी सैनिक मुक्कामी असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलंय.

डोकलाममध्ये ज्या ठिकाणी संघर्ष झाला होता, तिथे हे सैनिक नाही आहेत. तिथून काही मीटर अंतरावर हे सैनिक आहेत. पण भारताला ही चिथावणी आहे, यात वाद नाही. याआधी चिनी सैनिक गस्तीसाठी रोज डोकलामला यायचे आणि निघून जायचे.  1600-1800 चिनी सैनिकांचा मुक्काम  आहे. पण कोणत्याही प्रकारचं आव्हान सरकारनं दिलेलं नाही. चीननं देखील 2 हेलिपॅड्स बांधले  आहेत. चीनकडून रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. आधीचा रस्ता 10 किमीनं वाढवण्यात आला आहे.   भारताकडून अजून कुठलीही  प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काही महिन्यांपूर्वी भुतानच्या भूमीवर चिनी सैनिकांनी तळ ठोकला होता. रस्ते आणि रेल्वे बांधणीसाठी याचा वापर चीन करत होता.  तेव्हा भारताला  मदतीसाठी भुतानने पाचारण केलं होतं .त्यानंतर  भारताने डोकलाममध्य आपलं सैन्य पाठवून चीनची अडवणूक केली होती. त्यानंतर चीनने याचा प्रचंड विरोध केला होता. भारत 1962चं  युद्ध विसरलाय अशा शब्दात चीनने भारतावर टीका केली होती. नंतर दोघांच्या संगनमताने डोकलाममधून चीनने माघार घेतली होती. पण निर्मला सीतारमन यांनी अरूणाचल प्रदेशला भेट दिल्यानंतर चीनने पुन्हा टीकास्त्र सोडलं होतं.

सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत. अशा परिस्थीत  चीनने ही खेळी खेळल्यामुळे आता भारत काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 11, 2017, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading