चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज, आज महत्त्वपूर्ण बैठक

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज, आज महत्त्वपूर्ण बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार महत्त्वपूर्ण बैठक, काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : चीन आणि भारत यांच्यातील सीमारेषेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर दोन्ही सैन्यदलांमधील वाद विकोपाला पोहोचल्यानंतर आता मंगळवारी चीननं मोठं पाऊल उचललं आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाच्या अजस्त्र सैन्य बळाला नव्याने ट्रेनिग देण्याचा आदेश दिलाय. त्याचबरोबर युद्धासाठी कायम तयार राहा असेही आदेश दिले.

सीमारेषेवर सुरू असलेल्या हालचालींबाबत आणि लडाखच्या परिस्थिचीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्य दलाला सध्याच्या परिस्थीवर पर्याय सुचवण्याचं आवाहन केलं आहे. तीनही सैन्य दलाकडून सविस्तर अहवाल पंतप्रधान मोदींकडे सोपवण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. सध्याच्या सर्व परिस्थितीचा विचार करून तीनही सैन्यदलांनी ब्लू प्रिंट पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या आहेत.

हे वाचा-ड्रॅगनची डरकाळी: युद्धासाठी तयार राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश

भारत-चीनमध्ये तणावाचं वातावरण...नेमकं काय घडलं होतं?

5 मे रोजी लद्दाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. 5 मेनंतर हा वादा वाढत गेला याआधीही तर काही वर्षांपूर्वी डोकलाममध्ये चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलं होतं. आता पुन्हा एकदा वादाची स्थिती निर्माण झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.

लद्दाख सीमेवरचा चीनचा आक्रमकपणा आणि अमेरिकेसोबतचा तणाव या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी उच्च स्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

हे वाचा-रशियातील भीषण वादळामुळे तिघांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

बुधवारी होणाऱ्या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील तणावासोबतच भारत-पाकिस्तान सीमारेषेवरही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. लडाखच्या नियंत्रण रेषेवर भारतानंही आपलं सैन्य वाढवलं आहे. एकीकडे जग कोरोनाविरुद्ध लढत असताना चीननं आपला खरा रंग दाखवला आहे. लडाखच्या नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या चीनच्या कारनाम्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण बैठक घेणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा-WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर?

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 7:17 AM IST

ताज्या बातम्या