चीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा? राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखाने खळबळ

चीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा? राहुल गांधींनी शेअर केलेल्या लेखाने खळबळ

'प्रत्येक देशभक्ताने निवृत्त लेफ्टनंट पनाग यांचा लेख वाचावा. वस्तुस्थिती मान्य न करण्याने काहीच साध्य होणार नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 5 जून: भारत आणि चीनमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लष्करातल्या माजी अधिकाऱ्याचा लेख शेअर केलाय. त्या लेखामुळे दिल्लीच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी हा लेख लिहीला असून त्यात चीनने भारताच्या 40 ते 60 किलोमीटर प्रदेशावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

6  जूनला भारत आणि चीनच्या अधकाऱ्यांची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर द प्रिंट मध्ये पनाग यांनी हा लेख लिहून काही शक्यता व्यक्त केल्या आहेत. चीनने विविध तीन ठिकाणी भारताच्या 40 ते 60 किलोमीटर प्रदेशावर ताबा या आधीच ताबा मिळवला आहे. त्यामुळे चर्चेत चीनची बाजू वरचढ राहणार आहे.

तडजोड करताना चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि मान्य न होणाऱ्या अटी घालेल. त्या मान्य झाल्या नाहीत तर ताबा रेषेवर युद्धही चीन छेडू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हा लेख शेअर करताना राहुल गांधीं यांनी त्यावर आपली कमेंटही लिहिली आहे. प्रत्येक देशभक्ताने निवृत्त लेफ्टनंट पनाग यांचा लेख वाचावा. वस्तुस्थिती मान्य न करण्याने काहीच साध्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आता या लेखामुळे वाद निर्माण झाला आहे.

लेफ्टनंट पनाग यांनी काही वर्षांपूर्वी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. तर त्यांची कन्या आणि अभिनेत्री गुल पनागही आपमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या लेखावर शंका व्यक्त केली जातेय. पनाग यांचा हेतू प्रामाणिक नाही असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

ट्विटरवरही लोकांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केलीय तर काहींनी समर्थन केलंय.

First published: June 5, 2020, 8:03 PM IST

ताज्या बातम्या