चीन-पाकिस्तानकडे आहेत अधिक अण्वस्त्रं, तरीही भारतासमोर वाजू शकतो त्यांचा गेम

चीन-पाकिस्तानकडे आहेत अधिक अण्वस्त्रं, तरीही भारतासमोर वाजू शकतो त्यांचा गेम

जगातील अण्वस्त्रांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढली आहे. या अहवालानुसार चीन (China) आणि पाकिस्तानकडे (Pakistan) भारतापेक्षा अण्वस्त्रे अधिक आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : अण्वस्त्रांची (Nuclear Arsenal) शर्यत जगभरात वाढतच चालली आहे. अण्वस्त्रांवर देखरेख ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट’ (SIPRI) यांनी एका अहवालात दावा केला आहे की, जगातील अण्वस्त्रांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढली आहे. या अहवालानुसार चीन (China) आणि पाकिस्तानकडे (Pakistan) भारतापेक्षा अण्वस्त्रं अधिक आहेत.

एसआयपीआरआयच्या ताज्या अहवालानुसार चीनकडे 350 अण्वस्त्रं आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानकडे 165 अण्वस्त्रं आहेत. भारताकडे एकूण 156 अण्वस्त्रं आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की, सर्व देशांकडे एकत्रितपणे 13,080 अण्वस्त्रं आहेत. यापैकी रशियाकडे सर्वाधिक 6255 अण्वस्त्रं आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून त्यांच्याकडे 5550 अण्वस्त्रं आहेत. फ्रान्सकडे एकूण 290 अण्वस्त्रं आहेत. ब्रिटनकडे 225 अण्वस्त्रं आहेत. तसेच इस्त्रायलकडं 90 अण्वस्त्रं आहेत. उत्तर कोरियाकडे 40-50 अण्वस्त्रं आहेत.

या अहवालानुसार चीन आणि पाकिस्तानपेक्षा भारताकडे अण्वस्त्रं कमी आहेत. पण, काही बाबतीत भारत हा या दोन्ही देशांच्या पेक्षा वरचढ आहे. एका भारतीय अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या देशाकडे किती आण्विक शस्त्रे आहेत, यापेक्षा त्यांची वितरण व्यवस्था कशी आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. पाकिस्तानला उत्तर कोरियामुळं याबाबतीत निःसंशय फायदा झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, भारतात शस्त्रांच्या आधुनिकीकरण भर देण्यात आला असून त्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

हे वाचा - निलेश राणे आणि संजय काकडेंनी थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी, पुणे पालिकेनं बजावली नोटीस

या दोन देशांपेक्षा भारताकडे अण्वस्त्रं कमी असली तरी आपल्याकडे अग्नी -5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसारखी बरीच महत्त्वाची शस्त्रे आहेत. त्यांची उच्च दर्जाची क्षमता आहे, अग्नी-5 हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करू शकते. चीनसह संपूर्ण आशिया खंड त्याच्या टप्प्यात येेवू शकतो. यातून युरोप आणि आफ्रिकन देशांना देखील लक्ष्य केलं जावू शकतं. त्याचबरोबर भारताकडे राफेल ही लढाऊ विमानं देखील उपलब्ध आहेत, जी अत्यंत वेगात शत्रूचा पराभव करण्यास सक्षम आहेत. याशिवाय भारताकडं अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी आयएनएस अरिहंतही देखील आहे.

Published by: News18 Desk
First published: June 15, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या