'या' नेपाळी नेत्याला चीनपासून स्वतःच्या जीवाला धोका का वाटू लागला आहे?

'या' नेपाळी नेत्याला चीनपासून स्वतःच्या जीवाला धोका का वाटू लागला आहे?

चीनने कब्जा केला असल्याचे जाहीर करणाऱ्या नेपाळी नेता जीवन बहादूर शाही यांना चीनकडून धमकी मिळू लागली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : नेपाळ या देशासोबत असलेल्या चीनच्या कथित मैत्रीचं पितळ उघडं पडू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भारतासोबत तणावादरम्यान नेपाळ सोबत मैत्रीचा दिखावा करणारा चीन आता नेपाळच्या नेत्यांविरोधातच आक्रमक झाला आहे. अलिकडेच नेपाळच्या हूमला भागात चीनने कब्जा केला असल्याचे जाहीर करणाऱ्या नेपाळी नेता जीवन बहादूर शाही यांना चीनकडून धमकी मिळू लागली आहे.

नेपाळी स्थानिक वर्तमानपत्र खबरहबने याविषयी एक बातमी दिली आहे. याबाबत असं स्पष्ट होत आहे की जिल्ह्याच्या बॉर्डरपासून दोन किलोमीटर आत चीनच्या सैनिकांनी एक इमारत बांधली आहे. ही नऊ मजली इमारत असून इमारत बांधणं हे काही एका दिवसाचं काम नाही. म्हणजेच बांधकामावर स्थानिक प्रशासनाला याविषयी माहिती नक्कीच असली पाहिजे.

हूमला जिल्हा हा नेपाली खासदार जीवन वहादुर शाही ग्रुप जिल्हा आहे. त्यामुळेच त्यांनी पूर्ण चौकशी अंती आवाज उठवला आहे. त्यांनी सांगितलं आहे की चीनने 11 नंबरचा स्तंभ देखील हटवला असून त्यांनी अतिक्रमण करत इमारत बांधली आहे.

या बातम्या बाहेर आल्यावर पहिल्यांदा तर चीनने यावर काहीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. नंतर त्यांनी असं म्हटलं आहे की ही इमारत आणि इतर जे बांधकाम झालं आहेत ती चीनमध्येच आहेत. हे सांगून चीनने त्याठिकाणी नेपाळच्या लोकांना यायला बंदी घातली आहे.

नेपाळच्या केंद्र सरकारने चीनने कब्जा केल्याचा इन्कार केला आहे.

त्याचं असं म्हणणं आहे की ज्या इमारती विषयी बोललं जातंय ती नेपाळ - चीनच्या सीमेपासून 1 किमी दूर चीनमध्ये स्थित आहे. याच बरोबर त्यांनी असंदेखील म्हणाल आहे की या गोष्टीवरून आधीदेखील एकदा विवाद निर्माण झाला होता पण तो निराधार आहे.

पण सध्या चीन नेपाळमध्ये खूपच सक्रिय झाला आहे आणि काही दिवसापूर्वी गोरखा जिल्ह्याजवळ त्यांनी कब्जा केल्याची बातमी देखील आली होती. रुई या गावावर कब्जा केल्याच्या बातमीनंतर नेपाळच्या आंतरिक राजकारणात मोठा भूकंप झाला होता. विरोधी पक्षाचा असा आरोप आहे की ओली सरकार लाच घेऊन चीनला नेपाळमध्ये घुसखोरी करू देत आहे.

नेपाळी काँग्रेसचे नेते शाही यांना त्यांच्या वक्तव्यवामुळे धमक्या मिळत आहेत. प्रथम काठमांडूमधील चिनी दूतावासाने याबद्दल एक पत्रक काढून या वक्तव्याला पक्षपाती घोषित केलं. एवढंच नाही तर प्रोटोकॉल तोडून त्यांनी नेपाळी काँग्रेसला धमकी दिली की अशा वक्तव्यामुळे चीन व नेपाळचे संबंध बिघडू शकतात.

ही गोष्ट इथंच थांबली नाही तर चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स ने यावर एक लेख लिहिला, ज्यामध्ये त्यांच्या पक्षाबद्दल वाईट गोष्टीसोबतच असं लिहलं गेलं होतं की ते भारताच्या बाजूचे आहेत. आणि यानंतर कथित प्रकारे शाही यांना चीनकडून धमक्या मिळू लागल्या आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 28, 2020, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading