COVID-19 प्रकरणातही चीनने दिला भारताला धोका, धक्कादायक माहिती उघड

COVID-19 प्रकरणातही चीनने दिला भारताला धोका, धक्कादायक माहिती उघड

लडाखजवळच्या सीमेवर केलेही घुसखोरी, बोगस पीपीई किटचा पुरवढा अशा अनेक प्रकरणात चीनचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 29 जुलै: चीनमध्ये आलेल्या कोरोनाची (Coronavirus in China) साथीने आता सर्व जग व्यापलं आहे. जानेवारी महिन्यात ही साथ सुरु झाली होती. त्याची माहिती चीनने जगाला दिली नाही असा आरोप वारंवार केला जातो. हाच खोटारडेपणा चीनने भारतासोबतही केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) याबाबत माहिती दिली असून चीनने एक आठवडा उशीरा भारताला माहिती दिल्याचं उघड केलं आहे. महाभयंकर साथ असतानाही चीनने तब्बल आठवडाभर उशीरा माहिती सांगणं हे गंभीर असल्याचं सांगितलं जातं.

परराष्ट्र मंत्रालयाच्या समितीसमोर ही माहिती देण्यात आल्याचं उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलं.  लडाखजवळच्या सीमेवर केलेही घुसखोरी, बोगस पीपीई किटचा पुरवढा अशा अनेक  प्रकरणात चीनचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

हा साथीचा आजार आहे आणि तो झापाट्याने पसरू शकतो याची चीनला माहिती होती. मात्र चीनने जगापासून ती जाणीवपूर्वक लपवून ठेवली या आरोपाला यामुळे पुष्टी मिळत असल्याचा दावाही केला जात आहे.

चिनी कंपन्यांकडे शेवटचे 8 तास…अन्यथा भारतात कायमची बंदी

सर्व जगभर हा आजारो पसरावा असं चीनला वाटत होतं त्यामुळेच त्यांनी माहिती दडवून ठेवली असाही आरोप केला जातो. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार असं काही घडण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती जगाला जेणं बंधनकारक आहे. पण चीनने ते संकेत पाळलेले नाहीत.

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांवर गेली आहे. त्यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारतानंतर अमेरिक (America)  आणि ब्राझिलमध्येच (Brazil)  कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर देशात आत्तापर्यंत 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

चिनी कंपनीतील भारतीय कर्मचाऱ्याचा खुलासा; 'अलिबाबा'चे जॅक माला कोर्टाचा समन्स

भारतात मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत 49 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे Covid-19 रुग्णांची एकूण संख्या  15.31 लाख झाली आहे. तर 5.10 लाख रुग्ण Active आहेत. तर 9.87 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 34,224 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Covid-19 Patient) आज राज्यात 7 हजार 700 नवे रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असली तरी मृत्यूचा आकडा मात्र कमी होत नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 29, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या