अखेर चीन झुकला, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता

'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर लवकरच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 09:38 AM IST

अखेर चीन झुकला, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता

नवी दिल्ली, 1 मे :  'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर लवकरच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. अखेर आंतरराष्ट्रीय दबावासमोर चीन झुकला आहे. चीनकडून आजच व्हेटो मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीननं म्हटलं आहे की, मसूद अझहर प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर चीनचे हे वक्तव्य समोर आले आहे.

चीननं घातला होता खोडा

अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स ने 15 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझहरवर सर्व स्तरांवरून बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या शस्त्रांचा व्यापार आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांवर प्रतिंबध घालण्यात यावं. त्याच बरोबर त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी असं या प्रस्तावात मांडण्यात आलं आहे.

कुख्यात दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतासोबत अमेरिकानंदेखील आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केलं जावं, अशी मागणी वारंवार भारताकडून केली जात होती.  अमेरिकेची साथ मिळत असल्यानं भारताच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं होतं. मात्र, दुसरीकडे या प्रकरणात चीनने पुन्हा खोडा घातला आहे.वाचा : संसद हल्ला ते पुलावामा : क्रूरकर्मा मसूद अझहरच्या 'जैश'ने गेली 21 वर्षं असा घातला होता हैदोस

मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत घालायला पाक तयार, पण घातली 'ही' अट

मसूद अझहरचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकायची मागणी भारत गेली अनेक वर्षं करत आहे. पण दुसरीकडे, भारताने पुलवामा हल्ल्याचा पुरावा द्यायला हवा, तरच मसूद अझहरचं नाव काळ्या यादीत टाकण्याबद्दल आम्ही काही बोलू शकतो, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी म्हटलं आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'जैश ए मोहम्मद'ने स्वीकारली. तरीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही भूमिका मांडल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. 'पुलवामाचा संबंध अझहर मसूदशी लावू नये, तरच आम्ही त्याचं नाव काळ्या यादीत टाकायच्या गोष्टीवर चर्चा करू. पुलवामा हल्ल्याशी मसूदचा संबंध आहे, असं भारताला वाटत असेल तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत', असं या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

वाचा अन्य बातम्या

बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान

शिरुरमध्ये निवडणुकीनंतर वातावरण तापलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

त्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं भारतातलं पहिलं सर्जिकल स्ट्राइक

SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 09:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...