अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले 5 तरुण चीनने भारताकडे सोपवले!

अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले 5 तरुण चीनने भारताकडे सोपवले!

अरुणाचल प्रदेशमधून पाच तरुण गायब झाले होते. हे सर्व तरुण चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात असल्याचे समोर आले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशमधून गायब केलेल्या 5 भारतीय तरुणांची सुटका केली आहे. या पाचही तरुणांना भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे.  भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी चीनमधून या पाच तरुणांना भारतात सोडण्यात आले.

अरुणाचल प्रदेशमधून पाच तरुण गायब झाले होते. हे सर्व तरुण  चीनच्या  पिपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात असल्याचे समोर आले होते. अखेर या पाचही तरुणांना सोडण्यात आले आहे. तासाभरात हे पाचही तरुण भारताच्या हद्दीत पोहोचणार आहे. हे तरुण पायी प्रवास करत तासभरात बिथु सीमा चौकीत पोहोचणार आहे.

पैसे मिळवण्यासाठी काकांना मास्कचा असा केला जुगाड, PHOTO पाहून युझर्स झाले हैराण

याआधीही किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशमधील 5 तरुण बेपत्ता झाले असल्याचे सांगितले होते. पिपल्स लिबरेशन आर्मी या पाचही तरुणांना सोमवारी भारताकडे सोपवणार होती. बेपत्ता झालेले तरुण हे आमच्या ताब्यात असल्याचे पिपल्स लिबरेशन आर्मीने जाहीर केले होते. अखेर या तरुणांची आता सुटका होत आहे.

बेपत्ता झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मागील आठवड्यात शुक्रवारी घडली होती. नाचो भागातून हे तरुण बेपत्ता झाले होते. या पाचही तरुणांना पिपल्स लिबरेशन आर्मीने ताब्यात घेतले होते. या झटापटीतून दोन तरुणांनी सुखरूप सुटका करून परत आले होते.

पोलीस अधिक्षक तरू गुस्सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचो पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चीनी सैन्याने ज्या पाच तरुणाचे अपहरण केले होते त्यांची ओळख पटली. सिंगकम, प्रसात रिगलिंग, दोंगतू इबिया, तनू बाकर आणि नागरु दिरी अशी या पाच जणांची नावं होती.

Published by: sachin Salve
First published: September 12, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या