LIVE NOW

Live Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे

Lokmat.news18.com | August 21, 2018, 1:23 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 21, 2018
auto-refresh

Highlights

1:20 pm (IST)

मथुरा : मथुरेजवळ आज एक भीषण अपघात झाला. चुकीच्या बाजूनं ट्रेन पकडताना दुसऱ्या एका ट्रेननं उडवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. मथुरेपासून 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसी कलान रेल्वे स्थानकात हा अपघात झाला. आग्रा-दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेसला खूप गर्दी असते, म्हणून काही जण चुकीच्या बाजूनं ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं छत्तीसगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस आली. कोसी कलानला या ट्रेनचा हॉल्ट नसल्यानं ट्रेन वेगात होती. ट्रेननं एकूण 8 जणांना उडवलं. जखमींना तातडीनं नजीकच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, इतर प्रवाशांनी रेल्वे आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. 


1:19 pm (IST)

बंगळूरू : दक्षिण कर्नाटकच्या कूर्गमध्ये केरळसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे कूर्गकडे जाणारे सर्व रस्ते एक तर ठप्प आहेत किंवा खचले आहेत. गेल्या 10 दिवसांत तिथे इतका पाऊस झाला की ठिकठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.. कोडगू जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू झाला.. तर आतापर्यंत 4 हजार 320 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. काल पूरग्रस्तभागाचा हवाईदौरा करायला गेलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विमानात पेपर वाचत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नवा वाद निर्माण झालाय. तर दुसरे ज्येष्ठ मंत्री रेवण्णा हे पूरग्रस्तांना बिस्किटचे पुडे पुरग्रस्तांना फेकून मदत देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका होतेय.

1:15 pm (IST)

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भारतामध्ये अलीकडे फेक न्यूज वाचल्यामुळे जमावानं हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या. या फेक न्यूज बहुतांश वेळा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवल्या जातात. व्हॉट्सअॅपनं यावर तोडगा काढावा, अशी भारत सरकारची भूमिका आहे. तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅपनं भारतात अधिकारी नेमावेत, आणि भारतातही उप कंपनी स्थापित करावी, भारतातले कायदे कंपनीनं पाळावेत अशी सूचना प्रसाद यांनी डॅनियल्स यांना केली. तर वाट्सअॅप त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती क्रिस यांनी दिलीय.

 


8:40 am (IST)

बिजींग, २१ ऑगस्ट- चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेई यांच्या या दौऱ्याचे मुख्य उद्देश्य हे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेल्या अधिकृत सम्मेलनात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंबलबजावणी करणे हे आहे. वुहान बैठकीत मोदी आणि शी यांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि सीमेवर आप-आपल्या सैन्यांमध्ये ताळमेळ सुधारण्याचा निर्णय घेतला होता.

डोकलममध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये युद्धाचे चिन्ह दिसत होते. दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्री आणि भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यात प्रतिनिधिमंडळ स्थरावर अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. यासारख्या देश- विदेशच्या महत्त्वपूर्ण बातम्या तुम्ही इथे वाचू शकता.

Load More
बिजींग, २१ ऑगस्ट- चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेई यांच्या या दौऱ्याचे मुख्य उद्देश्य हे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेल्या अधिकृत सम्मेलनात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंबलबजावणी करणे हे आहे. वुहान बैठकीत मोदी आणि शी यांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि सीमेवर आप-आपल्या सैन्यांमध्ये ताळमेळ सुधारण्याचा निर्णय घेतला होता. डोकलममध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये युद्धाचे चिन्ह दिसत होते. दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्री आणि भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यात प्रतिनिधिमंडळ स्थरावर अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. यासारख्या देश- विदेशच्या महत्त्वपूर्ण बातम्या तुम्ही इथे वाचू शकता.
corona virus btn
corona virus btn
Loading