Home /News /national /

चीननं केला एलियन्स भेटल्याचा दावा; नंतर केले रिपोर्ट डिलीट, वाढतंय एलियनबाबत गूढ

चीननं केला एलियन्स भेटल्याचा दावा; नंतर केले रिपोर्ट डिलीट, वाढतंय एलियनबाबत गूढ

चीननं केला एलियन्स भेटल्याचा दावा; नंतर केले रिपोर्ट डिलीट, वाढतंय एलियनबाबत गूढ

चीननं केला एलियन्स भेटल्याचा दावा; नंतर केले रिपोर्ट डिलीट, वाढतंय एलियनबाबत गूढ

एलियन म्हणजे परग्रहवासी. त्यामुळे या विषयीचं कुतूहल अद्यापही कायमच आहे. अशातच आम्हाला एलियन भेटल्याचा दावा चीननं केला आहे. त्यामुळे आता एलियनबाबत गूढ वाढलं आहे.

मुंबई, 16 जून:  अंतराळातील (Space) इतर ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? या प्रश्नाची उकल माणूस गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे. परग्रहांवर एलियन (Alien) असल्याचे संकेत मिळाल्याचे दावे अनेकदा केले गेले आहेत. एलियन म्हणजे परग्रहवासी. त्यामुळे या विषयीचं कुतूहल अद्यापही कायम आहे. परंतु, त्याविषयी ठोस पुरावे मिळालेले नाहीत. चीनने (China) असाच काहीसा दावा केला आहे. एका टेलिस्कोप अर्थात दुर्बिणीच्या (Telescope) माध्यमातून आम्हाला एलियन असल्याचे संकेत मिळाल्याचं चीननं सांगितलं आहे. चीन 2020 पासून पृथ्वी व्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, याबाबत संशोधन करत आहे. चीन सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं अधिकृत वृत्तपत्र असलेल्या सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजी डेलीने प्रकाशित केलेल्या डॉक्युमेंट्सचा हवाला देत `ब्लूमबर्ग`ने या संबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. परंतु, हा विषय सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत येताच संबंधित अहवाल वेबसाईटवरून तातडीनं काढण्यात आल्यानं या विषयाचं गूढ अधिकच वाढलं आहे. वेबसाईटवरून अचानक काढला अहवाल मात्र, सोशल मीडियावर ही बातमी जोरदार चर्चेत आल्यानंतर सायन्स अ‍ॅंड टेक्नॉलॉजी डेलीच्या वेबसाईटवरून हा अहवाल काढण्यात आला आहे. चीनमधल्या गिझोउ प्रांतातील स्काय आय टेलिस्कोपवर (Sky Eye Telescope) 2020 मध्ये दोन अनोखे सिग्नल मिळाले होते. या ठिकाणी 2019 पासून डाटा जमा केला जात आहे. हेही वाचा - VIDEO : भारताच्या सीमेवर चीनची लढाऊ विमान तैनात? अजून संशोधन करण्याची गरज : संशोधक यानंतर 2022 मध्ये अशा प्रकारचे संकेत मिळाले असल्याचं मु्ख्य शास्त्रज्ञ झांग टोंजिए यांनी सांगितल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ``चिनी संशोधकांच्या पथकात बीजिंग येथील नॉर्मल युनिव्हर्सिटी, चायना अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि युनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेमधले संशोधक सहभागी आहेत. हे गूढ सिग्नल हा एक प्रकारचा रेडिओ इंटरफेरन्स असून, याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज आहे,`` असं झांग यांनी सांगितलं. जगातल्या सर्वांत मोठ्या टेलिस्कोपमधून मिळाले संकेत चीनने अधिकृतपणे जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी जगातला सर्वांत मोठा सिंगल - अ‍ॅपर्चर टेलिस्कोप खुला केला आहे. हा जगातला सर्वांत जास्त संवेदनशील टेलिस्कोप असल्याचा दावा चीननं केला आहे. हा 500 मीटरचा टेलिस्कोप पूर्वीच्या रेडिओ टेलिस्कोपच्या तुलनेत दुप्पट क्षेत्र कव्हर करू शकतो आणि त्याची निरीक्षणं 3 ते 5 पट अधिक अचूक असतील. एलियन अस्तित्वात असल्याचे विश्वसनीय पुरावे अद्याप मिळालेले नाही, असं 2021 मध्येच नासानं (NASA) सांगितलं आहे. नासानं एका खगोल जीवशास्त्र कार्यक्रमांतर्गत परग्रहांवरील जीवाची उत्पत्ती, मूळ आणि वितरण यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
First published:

Tags: Aliens, China

पुढील बातम्या