पाकिस्तानच्या मुद्द्यावर चीन एकटा पडला, मोदींची नेटवर्क 18 ला खास मुलाखत

पाकिस्तानच्या मुद्द्यावर चीन एकटा पडला, मोदींची नेटवर्क 18 ला खास मुलाखत

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटं पाडण्यात भारताला यश आलं, असा दावा मोदींनी केला. जगभरात फक्त चीनच पाकिस्तानला पाठिशी घालतो आहे, असं ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 एप्रिल : पाकिस्तानच्या मुद्द्यावरून चीन आणि भारत यांच्यात मतभेद आहेत. पण या मतभेदांचं वादात रूपांतर होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटं पाडण्यात भारताला यश आलं, असा दावा मोदींनी केला. जगभरात फक्त चीनच पाकिस्तानला पाठिशी घालतो आहे, असं ते म्हणाले.

भारताचे रशियाशी परस्पर सहकार्याचे संबंध आहेत. पण त्यानंतर पाकिस्तानच्या मुद्द्यावर आपण सगळ्या देशांचा पाठिंबा मिळवू शकलो हा भारताच्या परराष्ट्र नीतीतला मोठा बदल आहे, याचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केला.

नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी मोदींची ही खास मुलाखत घेतली. जगभरात इतर देशांशी विकसित केलेल्या संबंधांमुळे भारताचा दबदबा वाढला आहे. हा आमच्या यशाचा पुरावा आहे, असं मोदी म्हणाले.

चीनशी मतभेद असले तरी आम्ही त्यांच्याशीही सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी बांधिल आहोत, अशी ग्वाही मोदींनी दिली. भारताची चीनमध्ये गुंतवणूक आहे आणि चीननेही भारतात गुंतवणूक केली आहे.

चीन आणि भारताने सीमावादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याची तयारी दाखवली आहे. दोन्ही देशांचे याबद्दल वेगळे दृष्टिकोन आहेत पण हे मतभेद मिटवण्याचं ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल भारतानेही आपल्या पद्धतीने भूमिका घेतल्या आहेत. काही मुद्द्यांवर आपण पॅलेस्टाईनची बाजू घेतो तर काही मुद्द्यांवर इस्रायलची बाजू घेतो. प्रत्येकालाच भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पण दहशतवादाविरुद्धच्या लढाईत चीनने सामील व्हायला हवं, असंही मोदी म्हणाले.

=============================================================================================================================================================

VIDEO : 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'

First published: April 9, 2019, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading