लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जाऊ लागलीत लहान मुलं; कारण वाचून व्हाल हैराण

लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जाऊ लागलीत लहान मुलं; कारण वाचून व्हाल हैराण

मुलं (children) आपल्या पालकांकडे अशा मागण्या करत आहेत ज्या लॉकडाऊनमध्ये (lockdown) पूर्ण करता येऊ शकत नाही.

  • Share this:

भोपाळ, 25 मे : लॉकडाऊनमध्ये (lockdown) घरात कैद झालेली लहान मुलं (children) आता घर सोडून पळून जाऊ लागलीत. लॉकडाऊनमध्ये मुलं आपल्या पालकांकडे अशा मागण्या करत आहेत ज्या लॉकडाऊनमध्ये पूर्ण करता येऊ शकत नाही. मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) 30 पेक्षा अधिक प्रकरणं समोर आलीत. चाइल्ड लाइन काऊन्सलिंगनंतर या मुलांना त्यांच्या घरी पुन्हा सोडण्यात आलं आहे.

घर ते शाळा या प्रवासात मुलं सक्रिय असतात. मात्र आता लॉकडाऊनमुळे मुलं घरात कैद झालेत. त्यांना खेळायला मिळत नाही, शाळेत नाही तर घरात बंद खोलीत अभ्यास करावा लागतो आहे. मुलं घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मात्र घरातील मोठी माणसं त्यांना घराबाहेर पडू देत नाहीत. त्यामुळे नाराज झालेली मुलं आता घर सोडून पळून जाऊ लागलेत. आई-वडिलांचं ओरडणं त्यांना आवडत नाही आहे.

हे वाचा - मुंबईवरून पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवलं, आरोपीला अटक

भोपाळ चाइल्ड लाइन प्रभारी अर्चना सहाय यांनी सांगितलं, "लॉकडाऊनमुळे मुलं घराबाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत आई-वडील ओरडल्याने ते नाराज होऊन घर सोडून जातात. मुलांना घराबाहेर खेळायचं आहे, त्यांना वेगवेगळ्या वस्तू हव्या आहेत. मुलं घर सोडून पळातात आणि इकडेतिकडे फिरतात तेव्हा पोलीस त्यांना पकडून चाइल्ड लाइनकडे सोपवतात"

पोलिसांना अशी 30 पेक्षा अधिक मुलं सापडलीत. त्यांना चाइल्ड लाइनकडे सुपूर्द करण्यात आलं. चाइल्ड लाइनने त्यांच समपुदेशन केलं. समुपदेशनादरम्यान समजलं की, आईवडील ओरडल्याने ही मुलं घर सोडून पळत आहेत. मुलांना पहिल्यासारखं खेळायला मिळत नाही. बंद खोलीत त्यांचा अभ्यास होतो. पालकांनी सांगितलं की मुलं अशा वस्तूंची मागणी करत आहेत, जी त्यांना देऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये अनेक दुकानं बदं आहेत. अशात मुलांची मागणी पूर्ण नाही करू शकत. समुपदेशनानंतर या मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं.

हे वाचा - पालकांनो या टीप्स फॉलो करा; लॉकडाऊनमध्ये मुलं करणार नाहीत अभ्यासाचा कंटाळा

First published: May 25, 2020, 8:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading