'मेरा बाप गुनाहगार है' या अतिरेक्यांच्या मुलांनी पुसून टाकला त्यांच्यावरचा ठपका

'मेरा बाप गुनाहगार है' या अतिरेक्यांच्या मुलांनी पुसून टाकला त्यांच्यावरचा ठपका

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी हिची मुलगी हरिद्रा श्रीहरन हिची कहाणी ऐकण्यासारखी आहे. हरिद्राचा जन्म झाला वेल्लोरच्या तुरुंगामध्ये. तेव्हा राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी नलिनीवर खटला सुरू होता. हरिद्राने तिच्या लहानपणीची 6 वर्षं आपल्या आईसोबत तुरुंगात काढली. आता मात्र ती यूकेमध्ये उच्चशिक्षण घेते आहे.

  • Share this:

मुंबई,29 जुलै :अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातला 'मेरा बाप चोर है' हा डायलॉग तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटातल्या लहानग्याच्या हातावर लोक जबरदस्तीने हे वाक्य गोंदतात.

चुकीची कामं करणाऱ्या त्या व्यक्तीचं आयुष्य बरबाद होतंच पण त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचीही होरपळ होते. पण काही गुन्हेगारांच्या मुलांबद्दल असं घडलेलं नाही.

नलिनीची मुलगी हरिद्रा

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी हिची मुलगी हरिद्रा श्रीहरन हिची कहाणी ऐकण्यासारखी आहे. हरिद्राचा जन्म झाला वेल्लोरच्या तुरुंगामध्ये. तेव्हा राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी नलिनीवर खटला सुरू होता. हरिद्राने तिच्या लहानपणीची 6 वर्षं आपल्या आईसोबत तुरुंगात काढली. जेव्हा तिला आपल्या आईवडिलांच्या गुन्ह्याबदद्ल कळलं तेव्हा तिने त्यांना याचा जाब विचारला.

(हेही वाचा : विराट कर्णधार होतोच कसा? गावसकर यांनी निवड समितीला घेतले फैलावर )

या प्रतिकूल परिस्थितीतही तिने परदेशात जाऊन चांगलं शिक्षण घेतलं. सुरवातीला ती श्रीलंकेमध्ये शिकली आणि आता यूकेमध्ये ग्लास्गो विद्यापीठात ती उच्चशिक्षण घेते आहे.

हरिद्राच्या लग्नासाठी नलिनीला 30 दिवसांचा पॅरोल मिळाला तेव्हा हरिद्राबदद्ल सगळ्यांना अधिक माहिती मिळाली. ती बायोमेडिसीनचं शिक्षण घेते आहे.

अफजल गुरुच्या मुलाचं यश

नलिनीच नाही तर आणखीही काही अतिरेक्यांची मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत. संसदेवरच्या हल्ल्यानंतर अफजल गुरूला फाशी झाली. दहशतवादाचा चेहरा बनलेल्या अफजल गुरूचा मुलगा गालिब मात्र त्याची वेगळी ओळख बनवतो आहे. त्याने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवले. त्यामुळे काश्मीरमध्ये त्याचं कौतुक झालं.

झारखंडचा एक कुख्यात नक्षलवादी देवसिंहचा मुलगा अभिषेक राजन याने तर आयआयटीमध्ये शिक्षण घेतलं आहे. अभिषेक राजनने आयआयटी कानपूरमधून रसायनसास्त्राची पदवी घेतली आहे. त्याने मल्टिनॅशनल कंपन्यांमध्येही काम केलं आहे.

वीरप्पनच्या मुलींची प्रगती

आई किंवा वडिलांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्यांच्या मुलांना सन्मानाने जगणं खूप मुश्कील होऊन बसतं. आईवडिलांच्या छत्राशिवायच त्यांना मोठं व्हावं लागतं. तरीही या मुलांनी उच्चशिक्षण घेणं हे खरचं कौतुकास्द आहे, असं मानसशास्त्रज्ञही सांगतात.

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलींनाही अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. त्या वीरप्पनच्या मुली आहेत हे त्यांनी शाळेतही लपवून ठेवलं होतं. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.

==============================================================================================

आज कुछ तुफानी करते है! शिवेंद्रराजेंचं चित्तथरारक जिप्सी ड्रायव्हिंग, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading