सावधान! लटकत्या मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

सावधान! लटकत्या मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

मोबाइलच्या चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे एका दीड वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 19 मे : मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे किंवा मोबाइला चार्जिंगला असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. इतकंच काय तर अचानक मोबाइल फुटल्यामुळे गंभीर इजा झाल्याच्या बातम्याही तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

मोबाइलच्या चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे एका दीड वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. घटना घडल्यानंतर बाळाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याच्या मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा : धक्कादायक! दादा आणि वहिणी मतदानासाठी गेले असता घरात तरुणीने लावला गळफास

रमजान असल्यामुळे इफ्तारीच्या दावतसाठी गेले असता अहमद हुसैन यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. सहवर असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. मोबाइलच्या चार्जरमुळे सहवरला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे हुसैन कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मोबाइलचा चार्जर हा प्लगमध्ये लावला होता. त्याची वायर खाली लटकत होती. लटकत असलेल्या चार्जरचा पिन तोंडात गेल्यामुळे स्फोट झाला आणि त्यातच चिमुकल्याचा मृत्यू झाला.

मोबाइल किंवा चार्जर लहान मुलांच्या हातात देऊ नका. मुलांना इलेक्ट्रोनिक वस्तुंपासून लांब ठेवा अशा सुचना वारंवार देण्यात येतात. पण त्याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे अशा घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घेणं आणि त्यांच्यावर नजर ठेवणं महत्त्वाचं आहे.


48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या