Home /News /national /

आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार काम करावं लागतं : संरक्षण प्रमुख बिपिन रावत

आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार काम करावं लागतं : संरक्षण प्रमुख बिपिन रावत

देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. देशाच्या लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी ते निवृत्त झाले. त्यानंतर चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

    नवी दिल्ली, 01 जानेवारी : देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी पदभार स्वीकारला. देशाच्या लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी ते निवृत्त झाले. त्यानंतर चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आज त्यांनी सीडीएसचा पदभार स्वीकारला. यानंतर बोलताना बिपिन रावत म्हणाले की, तीनही दलांना एकत्र मिळून आणखी सक्षम करण्याचे ध्येय आहे.आम्ही राजकारणापासून दूर असतो. आम्हाला सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करावं लागतं असंही त्यांनी सांगितलं पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जनरल बिपिन रावत म्हणाले की, आमचे लक्ष्य तीन्ही सैन्यदलांना मिळून तीन नाही तर 5 किंवा 7 करण्यावर असेल, तीन सैन्यदल 1+1+1 मिळून तीन नाही तर 5 किंवा 7 होतील. यावर संरक्षणप्रमुखांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही. तसेच पाकव्याप्त काश्मीरबद्दल विचारले असता त्यावर तयार असलेले प्लॅन असे सार्वजनिक सांगता येत नाहीत असंही स्पष्ट केलं. देशाचे लष्कर, नौदल, वायुदल एकत्र मिळून काम करावेत. त्यांच्यात योग्य समन्वय साधण्याची जबाबदारी सीडीएसवर असणार आहे. देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDSची घोषणेची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदासाठी सुरक्षा प्रकरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समीतीने स्वीकारल्यानंतर सीडीएस पद निर्माण करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अहवाल सादर केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय तीनही दलांचे प्रमुख उपस्थित होते. 1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी चीफ ऑफ डिफेन्स पदाची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी सीडीएस पद निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Bipin rawat

    पुढील बातम्या