मराठी बातम्या /बातम्या /देश /

शहांच्या फोननेही केली नाही जादू; अखेर बिहारचं सरकार कोसळलं, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

शहांच्या फोननेही केली नाही जादू; अखेर बिहारचं सरकार कोसळलं, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

काल अमित शहांकडून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र...

काल अमित शहांकडून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र...

काल अमित शहांकडून सरकार वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र...

    पाटना, 9 ऑगस्ट : बिहारमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. यादरम्यान जदयूने भाजपसोबत असलेली युती तोडली आहे. काही वेळापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी बिहारचे राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनाम्यानंतर मीडियाशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी एनडीओ सरकारमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भाजपसोबत एक नव्हे अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत लवकरच त्यांचे नेते याबाबत सविस्तर भूमिका मांडतील असंही ते म्हणाले. काल भाजप नेते अमित शहा यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याचंही वृत्त समोर आलं होतं. जदयूने याचा दावा केला होता. यात बिहारमधील सत्ता वाचवण्यासाठी शहांकडून शेवटचा प्रयत्न असल्याचंही म्हटलं होतं. मात्र शहांच्या कार्यालयातून मात्र फोन कॉलबाबत नकार देण्यात आला होता. 160 आमदारांचं समर्थन... नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर जदयूकडून दावा केला जात आहे की, त्यांच्याजवळ 160 आमदारांचं समर्थन आहे. सर्वांची इच्छा होती की, भाजपसोबतची युती ठेवू नये. आमदार आणि खासदारांचं मत लक्षात घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, Bihar, Nitish kumar

    पुढील बातम्या