गोव्यात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जारी केला नवा नियम; अन्यथा ‘नो एन्ट्री’

गोव्यात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जारी केला नवा नियम; अन्यथा ‘नो एन्ट्री’

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली व हा नियम सर्वांसाठी अनिवार्य असल्याचे सांगितले.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : गोव्याच्या (Goa) सीमेत प्रवेश करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनामुळे (Coronavirus) देशात अनेक बदल झाले आहे. यापुढेही या बदलांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आम्ही कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक केलं आहे. येथे 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनची सुविधा मिळणार नसल्याने तत्सम व्यक्तीला कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट आणावे लागेल. यासाठी अर्थात यासाठी त्या व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. याचा अर्थ गोव्याला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

गोव्यात पुन्हा समोर आले कोरोनाचे रुग्ण

गोव्याला एप्रिल महिन्यातच कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने गोव्यात दस्तक दिला आहे. गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे एक अधिकारी आणि एक अन्य महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या नव्या प्रकरणांसह राज्यात एकूण 41 संक्रमितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाचे अधिकारी मुंबईहून गोव्याला आलेल्या 11 सदस्यीय दलाचा भाग होते.

3 एप्रिलला समोर आला होता शेवटचा रुग्ण

गोव्यात यापूर्वी कोविड – 19 चा शेवटचा रुग्ण 3 एप्रिल रोजी आढळून आला होता. गोव्यातील समोर आलेले कोरोनाचे 7 रुग्ण बरे झाल्यानंतर 1 मे रोजी राज्याला ग्रीन झोन घोषित करण्यात आले होते.

हे वाचा -कोट्यवधी ग्राहकांना SBI चा झटका! एफडी व्याजदरात मोठी कपात, वाचा काय आहेत नवे दर

 

First published: May 27, 2020, 4:32 PM IST

ताज्या बातम्या