मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुख्यमंत्र्यांचा सर्व आमदारांसाठी मोठा निर्णय, ठाकरेंचा थेट मोदींवर हल्ला, शिवसेनेची नवी रणनिती TOP बातम्या

मुख्यमंत्र्यांचा सर्व आमदारांसाठी मोठा निर्णय, ठाकरेंचा थेट मोदींवर हल्ला, शिवसेनेची नवी रणनिती TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 13 ऑगस्ट : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर भाजपमध्येही खांदेपालट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतरही खातेवाटप न झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिंदे गट नवीन शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मार्मिक या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी थेट मोदी सरकारवर हल्ला चढवला. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. बावनकुळे यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत खोचक टीका केली आहे. ते मार्मिक साप्ताहिकाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्री शिंदेंचा महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय फक्त त्यांच्या समर्थक आमदार किंवा भाजप आमदारांसाठी घेतलेला नाहीय, तर सर्वपक्षीय आमदारांसाठी घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंची नवी रणनीती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यात्वाचा राजीनामा देणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'मला रिटायरमेंट घ्यायची आहे, पण...' शेवटी राज्यपालांनी सांगूनच टाकलं! आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. वरिष्ठांकडून माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंचा थेट मोदी सरकारवर हल्ला, म्हणाले.. शिवसेनेच्या मार्मिक या मासिकाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदे गट प्रतिशिवसेनाभवन उभं करणार का? 'शिवसेना भवनासाठी (shivsena bhavan) जागा शोधत आहोत यावर मी भाष्य करणार नाही. खरा देव हा विचारामध्ये असतो, मात्र विचारांपासून लांब गेलो मग देव राहत नाही, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसकर (Deepak Kesarkar ) यांनी प्रतिशिवसेना भवनाच्या चर्चेवर भाष्य केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टाच्या माजी सरन्यायाधीशांचं मोठं पाऊल गरजू विद्यार्थ्यांसाठी अनेक मोठे व्यक्ती आपल्या कमाईतून किंवा पगारातून मदत करत असतात. तसंच पाऊल आता सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार रंजन गोगोई (Ex CJI and Rajya Sabha Leader Ranjan Gogoi) यांनी उचललं आहे. कायद्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खासदार म्हणून कमावलेला त्यांचा संपूर्ण पगार दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ज्यांच्या पुस्तकामुळे जगभरात उडाली खळबळ न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सलमान रश्दी कोण आहे आणि त्यांचा भारताशी काही संबंध आहे का? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Shivsena, Uddhav thacakrey

पुढील बातम्या