Home /News /national /

सरन्यायाधीश होताय निवृत्त, केंद्राकडूनही विचारणा, शिंदे गटाचा मार्ग सोपा?

सरन्यायाधीश होताय निवृत्त, केंद्राकडूनही विचारणा, शिंदे गटाचा मार्ग सोपा?

रमन्ना यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि शिंदे गटाची महत्त्वाची सुनावणी सुरू आहे.

रमन्ना यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि शिंदे गटाची महत्त्वाची सुनावणी सुरू आहे.

रमन्ना यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि शिंदे गटाची महत्त्वाची सुनावणी सुरू आहे.

    नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : शिवसेना कुणाची? या मुद्यावर न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला आहे. पण शिवसेनेचं पारड जड होताना दिसत आहे. पण, अशातच सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना हे ऑगस्ट महिन्यामध्ये निवृत्त होणार आहे. केंद्र सरकारनेही पुढील सरन्यायाधीश कोण असतील अशी विचारणा केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या याचिकेवर परिणाम होण्याची चिन्ह आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि शिंदे गटाच्या ५ याचिकांवर सुनावणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत चार वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मागील दोन दिवसांमध्ये सुनावणी झाली. पण कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. अशातच सरन्यायाधीश रमन्ना हे 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना (Chief Justice of India N V Ramana) यांनी आज पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री यांच्याकडे शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारीच रमन्ना यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार विचारणा केली होती. त्यानुसार, त्यांनी उदय उमेश ललित यांचे नाव सुचवले आहे. रमन्ना यांच्या खंडपीठापुढे शिवसेना आणि शिंदे गटाची महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. सलग दोन दिवस सुनावणीनंतर सोमवारी ८ ऑगस्टची नवी तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी बुधवारी युक्तिवाद करताना एक दिवस वाढवून घेतला होता. त्याआधी त्यांनी १ ऑगस्टची मुदत मागितली होती. ती कोर्टाने मंजूर केली होती. त्यामुळे कोर्टात तारीख पे तारीख हा कार्यक्रम सुरूच आहे. सरन्यायाधीश रमन्ना यांनी पाच खंडापीठापुढे हे प्रकरण सोपवायचे की नाही, याबद्दल सुतोवाच केला आहे. (शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली) अशीही चर्चा सुरू आहे की, रमन्ना हे याच महिन्यात निवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणताही मोठा अथवा वादग्रस्त निर्णय होणार नसल्याची चर्चा आहे. जर रमन्ना यांनी निर्णय पाच खंडपीठाकडे पुढे ढकला तर कायदेशीर प्रक्रिया पार पडायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडेल आणि नवे सरन्यायाधीश नियुक्त झाले तर त्याचा परिणाम सुनावणीवर होण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या