तिहारमधून सुटल्यानंतर चिदंबरम थेट सोनिया गांधींच्या भेटीला

तिहारमधून सुटल्यानंतर चिदंबरम थेट सोनिया गांधींच्या भेटीला

चिदंबरम हे उद्या संसदेत उपस्थित राहतील असं कार्ती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 04 डिसेंबर : INX मीडिया प्रकरणात गेली काही महिने तिहार तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची आज सुटका झाली. सुप्रीम कोर्टाने अखेर त्यांना जामीन मंजूर केला त्यामुळे त्यांची सुटका झाली. तिहामध्ये तब्बल 106 दिवस घालवल्यानंतर रात्री चिदंबरम तिहारमधून बाहेर आले त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही त्यांच्या स्वागताला हजर होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चिदंबरम हे थेट सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाने झाले. त्यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. चिदंबरम तुरुंगात असताना सोनिया गांधी यांनी त्यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. चिदंबरम हे उद्या संसदेत उपस्थित राहतील असं कार्ती यांनी सांगितलं.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या मतभेदांवर एकनाथ शिंदेंचा खुलासा

INX मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. गेल्या 106 दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे.

चिदंबरम यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. कोर्टाच्या या निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जामीन मंजूर करत असताना देश सोडू न जाण्याबरोबरच चिदंबरम यांना पत्रकार परिषद देखील घेता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा भाजपच्याच लोकांमुळे पराभव, खडसेंचा मोठा आरोप

काय आहे INX मीडिया खटला ?

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 2007 मध्ये INX मीडिया या नावाने कंपनी बनवली. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या FIPB ने INX मीडिया ला 4 कोटी 62 लाख रुपयांच्या परकीय गुंवणुकीची मर्यादा दिली होती. पण INX मीडिया ने हे नियम धाब्यावर बसवून 305 कोटी 36 लाख रुपये परकीय गुंतवणूक मिळवली. या रकमेतून INX मीडिया कंपनीने बेकायदेशीररित्या 26 टक्के रक्कम न्यूज चॅनलमध्ये गुंतवली. त्यासाठी त्यांनी FIPB ची परवानगीही घेतली नव्हती. CBI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, INX मीडिया कंपनीसाठी मॉरिशसमधल्या 3 कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे येत होते, असं अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर शाखेने म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 4, 2019, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading