चिदंबरम यांचा मुक्काम आता 'तिहार'मध्ये; असं असेल त्यांचं जेवण आणि कोठडी!

चिदंबरम यांचा मुक्काम आता 'तिहार'मध्ये; असं असेल त्यांचं जेवण आणि कोठडी!

चिदंबरम हे माजी गृहमंत्री असल्याने त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना 1 नंबरच्या कोठडीतही ठेवलं जाऊ शकतं. या कोठडीत अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठेवण्यात येतं.

  • Share this:

नवी दिल्ली 5 सप्टेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा मुक्काम आता 'तिहार'मध्ये असणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना तिहारमध्ये पाठविण्यात आलंय. आपल्याला तिहारमध्ये पाठविण्यात येवू नये अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. आत्तापर्यंत त्यांना सीबीआय मुख्यालयातल्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिहारमधल्या ज्या कोठडीत त्यांच्या मुलाला ठेवण्यात आलं होतं त्याच कोठडीत त्यांना आता ठेवण्यात येणार आहे. तिहारमधल्या 7 नंबरच्या कोठडीत त्यांना ठेवण्यात येणार आहे. आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींना या कोठडीत ठेवलं जातं. चिदंबरम यांना झे सुरक्षा असल्यामुळे विशेष काळजी घेण्यात येत आहे. मात्र त्यांना कोठडीच कुठल्याही विशेष सुविधा देण्यात येणार नाहीत. एसी किंवा इतर सुविधा या कोठडीत दिली जात नाही. त्यांना लाकडी पलंगावर झोपावं लागणार असून तुरुंग प्रशासनातर्फे त्यांना एक ब्लॅकेंट देण्यात येणार आहे.

'ट्राफिक' नियमांपासून वाचण्यासाठी खास 'जुगाड', पोलिसही चक्रावले, VIDEO व्हायरल

जेवणात त्यांना एक वाटी दाळ, भाजी आणि तीन चार पोळ्या असं जेवण मिळतं. चिदंबरम हे दक्षिण भारतीय पदार्थांचे चाहते असल्याने त्यांना जेलमध्ये कॅण्टीनमधून काही पदार्थ ऑर्डर करता येतील. घरचं जेवणं पाहिजे असेल तर त्यांना कोर्टाकडून आदेश आणावा लागणार आहे.

74 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म; भारतीय आईनं नोंदवलं वर्ल्ड रेकॉर्ड

1 नंबर कोठडी जास्त सुरक्षीत

चिदंबरम हे माजी गृहमंत्री असल्याने त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना 1 नंबरच्या कोठडीतही ठेवलं जाऊ शकतं. या कोठडीत अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठेवण्यात येतं. सुरेश कलमाडी, सुखराम, चंद्रास्वामी अशा सारखी कैदी इथे ठेवण्यात आले होते. एखाद्या कैद्याला कुठे ठेवायचं याचा निर्णय कारागृह प्रशासन करत असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या