मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘कोरोना’च्या भीतीनं सर्वसामान्यांनी चिकनकडे फिरवली पाठ, मग मंत्र्यांनीच मारला ताव

‘कोरोना’च्या भीतीनं सर्वसामान्यांनी चिकनकडे फिरवली पाठ, मग मंत्र्यांनीच मारला ताव

चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस (Coronavirus) होतो, अशी अफवा पसरली आणि या अफवेमुळे लोकांनी चिकन, अंडी खाणंच सोडलं. ही अफवा दूर करण्यासाठी खुद्द मंत्र्यांवर (Ministrs) सर्वांसमोर चिकन खाण्याची वेळ आली.

    हैदराबाद, 29 फेब्रुवारी :  भारतात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रकरणं कमी असली, तरी दहशत इतकी आहे, की लोकांनी अक्षरश: चिकन (chicken), अंड्यांकडे (egg) पाठ फिरवली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, अशी अफवा पसरली आणि या अफवेमुळे लोकांनी चिकन, अंडी खाणंच सोडलं. ही अफवा इतकी पसरली आहे, की खुद्द मंत्र्यांवरच (Ministrs) सर्वांसमोर चिकन खाण्याची वेळ आली. चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो ही अफवा दूर करण्यासाठी तेलंगानातील मंत्र्यांनी (Telangana minister) स्टेजवर सर्वांसमोर चिकन खाल्लं आणि चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, हे त्यांनी सांगितलं. यामध्ये तेलंगानाचे मंत्री केटी राम राव, एटेला राजेंद्र, तलासनी श्रीनिवास आणि इतर मंत्र्यांचा समावेश होता.  यासाठी हैदराबादमध्ये  शुक्रवारी विशेष चिकन अँड एग जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. हेदेखील वाचा - Fact Check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का? केंद्र सरकारही म्हणालं चिकनमुळे होत नाही कोरोना चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, या भीतीमुळे लोकांनी चिकन खाणं सोडलं आणि त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला. त्यानंतर केंद्र सरकारनेही लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, अशी पुष्टी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने दिली. 'चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं. जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. हेदेखील वाचा - बापरे ! कुत्र्यालाही झाला 'कोरोना', माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस अफवा पसरवणाऱ्यांना झटका चिकन खाल्यामुळे कोरोनोव्हायरस होतो या अफवेविरोधात महाराष्ट्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्या वतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म उत्पादकांचं नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Chicken, Coronavirus, India

    पुढील बातम्या