छोटा शकील म्हणतो, दाऊदला भारतात यायचंच नाही !

छोटा शकील म्हणतो, दाऊदला भारतात यायचंच नाही !

मुंबईवर साखळी हल्ल्याचा आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमने भारतात येण्याची तयारी दर्शवली खरी पण

  • Share this:

08 मार्च : मुंबईवर साखळी हल्ल्याचा आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमने भारतात येण्याची तयारी दर्शवली खरी पण आता दाऊदचा खास माणूस छोटा शकीलने घूमजाव केलंय. दाऊदला भारतात यायचं नाहीये अशी माहिती दिलीये.

आर्थर रोड कारागृहात ठेवण्याच्या अटीवर दाऊद भारतात येण्यासाठी तयार आहे असा दावा दाऊदचा भाऊ म्हणजेच इक्बाल कासकरनं केला होता. मात्र दाऊदला भारतात येण्यासाठी तयार नाही अशी माहिती खुद्ध छोटा शकीलनं दिलीय. छोटा शकीलच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलीय.

सीएनएन न्यूज 18चे प्रतिनिधी मनोज गुप्ता यांनी छोटा शकीलला दाऊदच्या भारतात परतण्यावर प्रश्न विचारला असता त्यानं सपशेल नकार दिला.

छोटा शकील नेमकं काय म्हणाला ?

मनोज : भाईला शरण यायचं आहे, अशी बातमी आहे.

छोटा शकील : काय झालंय तुला? कोण म्हणालं असं?

मनोज : केसवानी या वकिलांनी सांगितलं.

छोटा शकील : नाही..नाही..नाही...त्यांना भाईबद्दल काय माहीत आहे?...आणि कुणाला काय माहीत असेल?

मनोज : तुझं बरोबर आहे.

छोटा शकील : मी सांगितल्याशिवाय यावर विश्वास ठेवू नकोस.

छोटा शकील : कुणावरही विश्वास ठेवू नकोस.

मनोज : बरोबर...

छोटा शकील : असं काहीच नाही...अशी कोणतीच चर्चा नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 08:33 PM IST

ताज्या बातम्या