छोटा राजन आणि तीन पासपोर्ट अधिकाऱ्यांना सात वर्षाचा कारावास

छोटा राजन आणि तीन पासपोर्ट अधिकाऱ्यांना सात वर्षाचा कारावास

बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ठोठावली आहे.

  • Share this:

25 एप्रिल : बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निखाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ठोठावली आहे.

बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल आणि ललिता लक्ष्मणन यांना काल विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणं, फसवणूक, खोटी कागदपत्रे बनवणं असे आरोपपत्र दाखल केले होते. तसेच, बंगळुरुमध्ये 1998-99 साली पोस्टपोर्ट अधिकारी रहाटे, शहा आणि लक्ष्मणनच्या मदतीने छोटा राजनने मोहन कुमार अशा नावाने बनावट पासपोर्ट मिळवला होता असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता.

छोटा राजनवर 70हून जास्त आरोप आहेत. मोहन कुमार नावाचा पासपोर्ट घेऊन  राजन भारतातून आॅस्ट्रेलियाला पळून गेला होता. तिथे तो 12 वर्ष राहिला.

त्यानंतर आॅक्टोबर 2015मध्ये छोटा राजन तिथून इंडोनेशियाला आला. त्याला बालीमध्ये पकडून 2015मध्ये भारताकडे सोपवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 05:49 PM IST

ताज्या बातम्या