नदीत पिकनिक पडली भारी, नागपूरचे कुटुंब अडकले होते पुरात, VIDEO

नदीत पिकनिक पडली भारी, नागपूरचे कुटुंब अडकले होते पुरात, VIDEO

नदीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे एकाच कुटुंबातील 12 जण पुराने वेढले गेले होते. त्यांच्यासोबत इतरही काही लोकं अडकली होती

  • Share this:

छिंदवाडा, 23 जून : सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी आणि नाले ओसांडून वाहत आहे. त्यामुळे अनेक जण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी फेरफटका मारत आहे. पण नागपूरमधील (nagpur) एका कुटुंबाला पिकनिक चांगलीच महागात पडली आहे. छिंदवाडा (chhindwara) येथील सौसरच्या घोघरा धबधब्याजवळ ( ghogra waterfall madhya pradesh) तब्बल 3 तास हे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलं होतं. अखेर मोठ्या मुश्लिकीने या कुटुंबातील 12 जणांची सुटका करण्यात आली आहे.

नागपूरमधील एक कुटुंब पिकनिकच्या निमित्ताने मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील सौसरच्या घोघरा धबधबा पाहण्यास गेले होते. मंगळवारी दुपारी हे कुटुंब नदीतील एका उंच भागावर जाऊन निवांत बसले होते. पण, अचानक पाण्याची पातळी वाढली.

नदीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे एकाच कुटुंबातील 12 जण पुराने वेढले गेले होते. त्यांच्यासोबत इतरही काही लोकं अडकली होती. आपल्याला बाहेर काढण्यासाठी आरडाओरडा केला त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

हद्द झाली! जग लढतंय कोरोनाशी आणि चीनमध्ये सुरू आहे 'डॉग मीट फेस्टिव्हल'

जेव्हा पाण्याची पातळी कमी होती, तेव्हा हे कुटुंब तिथे जाऊन पोहोचले होते. अखेर रेस्क्यू टीमने 3 तास अथक प्रयत्न केल्यानंतर या सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

Published by: sachin Salve
First published: June 23, 2021, 9:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या