S M L

मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानात अग्नितांडव, 20 जणांचा होरपळून मृत्यू

हर्रई विभागातील बारगी गावात ही दुर्घटना घडली. सहकारी समिती केंद्रामध्ये रेशनिंग दुकान असून तिथे रॉकेल वितरण केलं जातं होतं

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2017 09:15 PM IST

मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानात अग्नितांडव, 20 जणांचा होरपळून मृत्यू

21 एप्रिल : मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशनिंग दुकानाला भीषण आग लागलीय. या दुर्घटनेत 20 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राॅकेल वाटप करताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्रई विभागातील बारगी गावात ही दुर्घटना घडली. सहकारी समिती केंद्रामध्ये रेशनिंग दुकान असून तिथे रॉकेल वितरण केलं जातं होतं. रेशन घेण्यासाठी शेकडो गावकऱ्यांनी गर्दी केली होती. तर रेशनिंग दुकानात 35 ते 40 लोकं होती. त्याचवेळी अचानक आग लागली. काही क्षणात रेशनिंग दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. त्यामुळे आतमध्ये असलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात मोठी शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आण्यात यश आलं. मात्र, ही आग कशामुळे लागली याबद्दल माहिती कळू शकली नाही.

दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: chhindwara
First Published: Apr 21, 2017 09:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close