नवी दिल्ली, 10 एप्रिल : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दिवशी कोणत्या-ना-कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान, आयकर विभागाकडून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या निकटवर्तीयांविरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या छिंदवाडा विधानसभा मतदारसंघातून कमलनाथ तर छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी (9 एप्रिल)दाखल केला. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार दोघांच्याही आर्थिक उत्पन्नाचा आकडा समोर आला आहे. विशेष म्हणजे नकुल नाथ यांचे उत्पन्न कमलनाथ यांच्याहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
याशिवाय, कमल नाथ आणि नकुल नाथ यांच्याविरोधात भाजप उमेदवारांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कमल नाथ यांच्याविरोधात भाजपचे विवेक साहू आणि नकुल नाथ यांच्याविरोधात नाथन शाह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नकुल नाथ यांच्या आर्थिक उत्पन्नाची माहिती
- नकुल नाथ यांचे आर्थिक उत्पन्न 2013-14 मध्ये 98 लाख 30 हजार रुपये होते,या उत्पन्नात 2017-18मध्ये वाढ होऊन 2 कोटी 76 लाख 81 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं
- नकुल नाथ यांची पत्नी प्रिया नाथ यांचे आर्थिक उत्पन्न 2013-14 मध्ये 12 लाख 9 हजार रुपये होतं, यानंतर 2017-18मध्ये त्यात वाढ होऊन 4 कोटी 18 लाख रुपये एवढं उत्पन्न झालं
कमलनाथ यांचं आर्थिक उत्पन्न
- कमलनाथ यांचे 2013-14 मध्ये आर्थिक उत्पन्न 32 लाख 48 हजार रुपये एवढं होतं. यात 2017-18 मध्ये वाढ होऊन ते 1 कोटी 38 लाख 44 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं
- कमलनाथ यांची पत्नी अलका नाथ यांचे उत्पन्न 2013-14 मध्ये 23 लाख 74 हजार रुपए एवढं होते, 2017-18 मध्ये ते 96 लाख 22 हजार रुपये एवढं झाले आहे
भाजप उमेदवार नाथन शाह यांचे आर्थिक उत्पन्न
2014-15 : 3 लाख 16 हजार रुपये
2018-19 : 4 लाख 85 हजार रुपये
कमल नाथ यांच्या विरोधातील भाजप उमेदवार विवेक साहू यांचे आर्थिक उत्पन्न
2013-14 : 13 लाख 95 हजार रुपये
2017-18 : 5 लाख 21 हजार रुपये
वाचा अन्य बातम्या
SPECIAL REPORT : महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ पवारांनी घडवला आदर्श, असं काय घडलं?
VIDEO : जम्मू-काश्मीरचा वाद हा नेहरूंमुळे वाढला - मोदी
VIDEO : मसूदची बाजू घेणाऱ्या चीनसोबत कशी डील करणार? पंतप्रधान मोदी म्हणतात...
एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत